शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्याविरोधात मराठा क्रांती मोर्चाने आक्रमक भूमिका घेतल्याचं चित्र पहायला मिळत आहे. महापुरुषांबरोबरच छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल सत्ताधारी तसेच राज्याच्या राज्यपालांकडून करण्यात आलेल्या वादग्रस्त विधानांच्या निषेधार्थ महाविकास आघाडीमधील घटकपक्षांनी शनिवारी पुकारलेल्या आंदोलनाचा फोटो म्हणून राऊत यांनी मराठा क्रांती मोर्चाचा जुना फोटो ट्वीटरवरुन शेअर केल्याचा निषेध मराठा क्रांती मोर्चाने केला आहे. सोमवारी मुंबईतील शिवसेना भवानासमोर संजय राऊतांच्या फोटोला शाई फासून ते फोटो जाळत मराठा क्रांती मोर्चाकडून राऊतांचा निषेध करण्यात आला. यावेळी मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांनी दरवेळेस राऊत मराठा समाजाच्या अस्मितेबद्दल वादग्रस्त विधाने करत असल्याचं अधोरेखित करत छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेण्याची राऊत यांची लायकी नसल्याची टीका केली आहे.

मराठा क्रांती मोर्चेचे समन्वयक विनोद पाटील यांनी मराठा क्रांती मोर्चाची भूमिका मांडताना संजय राऊतांनी केलेल्या ट्विटवरुन खडेबोल सुनावले. “२०१७ ला मराठा क्रांती मोर्चेचा व्हिज्युएल्स दाखवून तो महाविकास आघाडीचा मोर्चा असल्याचा दावा करणारं ट्विट राऊतांनी केलं होतं. त्यांनी ‘सामना’मध्ये ‘मुका मोर्चा’ असं छापलं होतं. मराठा समाजाला नावं ठेवणारा, आमच्या आया-बहिणींची इज्जत काढाणारा (व्यक्ती) आमचा मोर्चा (त्यांचा म्हणून) दाखवतोय. तुमच्यात हिंमत आहे तर तुमचा मोर्चा काढा. आमचा मोर्चा का दाखवता?” असा प्रश्न पाटील यांनी संजय राऊतांना विचारला.

“मराठा क्रांती मोर्चाला महाविकास आघाडीचा मोर्चा म्हणून दाखवल्याने आम्ही इथे निषेध करत आहोत. प्रत्येक वेळेस हा संजय राऊत मराठ्यांच्या अस्मितेबद्दल बोलतो. तुम्ही मराठा समाजातील आया बहिणींना मुका मोर्चा म्हणता याची लाज वाटत नाही का संजय राऊतला?” अशा शब्दांमध्ये पाटील यांनी राऊतांबद्दल आपला संताप व्यक्त केला.

नक्की वाचा >> Gram Panchayat Election Results: फडणवीस प्रचंड आशावादी! म्हणाले, “कोणी काहीही काळजी करु नका, लिहून घ्या की महाराष्ट्रात…”

तो मोर्चा आणि कालचा मोर्चा शिवाजी महाराजांबद्दलच निघाले होते असा युक्तीवाद राऊत यांनी केला आहे, असं म्हणत पत्रकाराने पाटील यांना प्रश्न विचारला. यासंदर्भातील स्पष्टीकरण देताना राऊत यांनी ट्विटही केलं होतं.

नक्की वाचा >> फडणवीसांनी भाजपा आमदारांना झापलं; म्हणाले, “काही आमदार असे आहेत ज्यांच्या फेसबुकवर…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मराठा क्रांती मोर्चा आणि महाविकास आघाडीच्या मोर्चामध्ये साम्य दर्शवणाऱ्या राऊतांच्या युक्तीवादावरही पाटील यांनी उत्तर दिलं. “छत्रपती शिवाजी महाराजांचा आम्ही मनापासून आदर करतो. मराठा क्रांती मोर्चा मराठा समाजाच्या मागणीसाठी होता. हा काय सांगतोय शिवरायांचा सन्मान करतो म्हणून? हा संजय राऊत छत्रपती शिवाजी महाराजांच्या वंशजांचा पुरावा मागतो. छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेण्याची या संजय राऊतची लायकी नाही,” असा टोला पाटील यांनी लगावली.