बीड जिल्हय़ातही मुलींनीच मारली बाजी औरंगाबाद विभागात वाढला बीडचा टक्का
माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परिक्षेच्या निकालात राज्यातून मुलींनीच बाजी मारली आहे. बीड जिल्हय़ातूनही ९३.६२ टक्के मुली उत्तीर्ण झाल्या आहेत. मुलांपेक्षा मुलीच अव्वल ठरल्याचे दहावीच्या निकालावरुन दिसून आले. बारावीप्रमाणेच दहावीच्या परिक्षेत ही औरंगाबाद विभागात बीडचा टक्का वाढला आहे.
बीड जिल्हय़ातून दहावीच्या परिक्षेकरिता ३५ हजार ५४८ विद्यार्थी बसले होते. यापकी ३२ हजार ६६० विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. मंगळवार दि. १७ जून रोजी दहावीचा निकाल जाहीर झाला. बीड जिल्हय़ातील ६०९ शाळांनी या परिक्षेत घवघवीत यश संपादन केले आहे. शंभरपेक्षा अधिक शाळांनी पकीच्या पकी गुण मिळवले आहेत. बीड जिल्हय़ातून चौदा हजार २२४ विद्यार्थीनींनी दहावीची परिक्षा दिली होती. यापकी १३ हजार ३१७ विद्यार्थीनी उत्तीर्ण झाल्या आहेत. ज्याचे प्रमाण ९३.६२ टक्के आहे. या परिक्षेत जिल्हयातून २१ हजार ३२४ मुले बसली होती. यापकी १९ हजार ३४३ मुले उत्तीर्ण झाली आहेत. ज्याचे प्रमाण ९०.७१ आहे. बीड जिल्हय़ाचा एकूण निकाल ९१.८८ टक्के लागला आहे. दहावीच्या निकालामध्ये राज्यभरातून मुलीच अव्वल ठरल्या आहेत. बीड जिल्हय़ातूनही मुलींनीच बाजी मारली असून मुलांपेक्षा मुलीच सरस ठरल्या आहेत. एकूण ६०९ शाळांपकी एकाही शाळेचा निकाल शून्य टक्के लागलेला नाही. बहुतांश शाळांचे निकाल ८० टक्क्याच्या पुढेच लागले आहेत. बारावीच्या निकालात औरंगाबाद विभागातून बीड जिल्हय़ाचा सर्वाधिक निकाल लागला होता. त्याचप्रमाणे दहावीच्या निकालातही विभागातून बीड जिल्हय़ानेच आपले वर्चस्व प्रस्थापित केले आहे.
जि. प. शाळांचा निकाल घसरला
दहावीच्या निकालामध्ये अनेक शाळांनी शंभरपकी शंभरगुण मिळवले आहेत. बेस्ट फाईवमुळे निकालामध्ये वाढ झालेली असली तरी जिल्हा परिषद शाळांचा निकाल मात्र घसरलेला आहे. माजलगांव, धारुर या तालुक्यातील काही जिल्हा परिषद शाळांनी ३० ते ५० टक्क्यांपर्यंतच मजल मारली आहे. तर काही शाळांचा निकाल ३० टक्क्याच्या आतमध्ये आहे. जिल्हा परिषदेपेक्षा खाजगी शाळांनी निकालाची परंपरा कायम ठेवलेली आहे. इंग्रजी माध्यमाच्या जवळपास सर्वच शाळांनी पकीच्या पकी गुण मिळवले आहेत.
उस्मानाबादचा निकाल ८४.८६ टक्के
मार्च महिन्यात घेण्यात आलेल्या दहावी परीक्षेचा निकाल मंगळवारी दुपारी एक वाजता जाहीर झाला. मागील वर्षांच्या तुलनेत यंदा जिल्ह्याच्या निकालाचा टक्का चांगलाच वधारला आहे. जिल्ह्याचा एकूण निकाल ८४.८६ टक्के एवढा लागला आहे. मागील वर्षी निकालाचा हा टक्का ७७.४८ एवढा होता. यंदाही मुलींनीच बाजी मारली आहे. मुलींचे उत्तीर्ण होण्याचे प्रमाण ८७.९९ टक्के एवढे आहे, तर मुलांच्या उत्तीर्ण होण्याचे प्रमाण ८२.०१ टक्के आहे.
जिल्ह्यातील ४०६ शाळांमधून यंदा एकूण २० हजार ८२५ विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी अर्ज दाखल केले होते. त्यापकी २० हजार ७१५ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. यातील १७ हजार ५५३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. यात मुलींची संख्या ९ हजार २५६ एवढी तर मुलांची संख्या ८ हजार २९७ एवढी आहे.
उस्मानाबाद जिल्ह्यातील २५ शाळांचा निकाल १०० टक्के आहे. जिल्ह्यात गतवर्षीप्रमाणे यंदाही भूम तालुक्याने अव्वल स्थान कायम ठेवले आहे. तालुक्याचा निकाल सर्वाधिक ९१.११ टक्के एवढा लागला असून गतवर्षी हा निकाल ८४.३५ टक्के एवढा होता. जिल्ह्यातील अन्य तालुक्यांचा निकाल पुढीलप्रमाणे – कंसात दिलेला निकाल गतवर्षीचा आहे. लोहारा ८२.२८ (७६.१२), परंडा ८६.९३ (८३.८०), उस्मानाबाद ८६.२१ (७८.४६) कळंब ८२.१० (७३.४८), वाशी ८३.२५ (७१.४३), उमरगा ८४.९६ (७६.५७) तर तुळजापूर तालुक्याचा निकाल ८१.८१ टक्के लागला आहे. गतवर्षी हा निकाल ७५.६१ टक्के लागला एवढा होता.
औरंगाबाद निकाल ८८.१४ टक्के
दहावीच्या परीक्षेत औरंगाबाद जिल्हय़ातील विद्यार्थी उत्तीर्णतेचे प्रमाण ८८.१४ टक्के असल्याचे मंगळवारी स्पष्ट झाले. जिल्हय़ात ५३ हजार ७७६ विद्यार्थ्यांची नोंदणी झाली होती. त्यापैकी ५३ हजार ५३२ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. ४७ हजार १८४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. निकालात आघाडी घेण्याची परंपरा पुन्हा एकदा मुलींनीच राखली. परीक्षार्थी २२ हजार ९५१ मुलींपैकी २० हजार ८८९ मुली उत्तीर्ण झाल्या. हे प्रमाण ९१.२ टक्के एवढे आहे. मराठवाडय़ात सर्वाधिक बीड जिल्हय़ातील विद्यार्थ्यांनी यश मिळविले.
जिल्हय़ात कॉपीमुक्त वातावरणात परीक्षा व्हाव्यात म्हणून ३३ भरारी पथकांची नियुक्ती करण्यात आली होती. ३८ विद्यार्थ्यांवर कारवाई करण्यात आली. यामुळे परीक्षा सुरळीत पार पडल्याचा दावा औरंगाबाद विभागीय मंडळाचे अध्यक्ष सुखदेव डेरे यांनी केला. विशेष प्रावीण्य मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या औरंगाबाद जिल्हय़ात सर्वाधिक आहे. ११ हजार ७२५ विद्यार्थ्यांनी विशेष प्रावीण्य मिळविले. प्रथमश्रेणीत ११ हजार ६६७, द्वितीय श्रेणीत १४ हजार १६१ तर फक्त उत्तीर्ण या श्रेणीत केवळ २ हजार ६११ विद्यार्थी आहेत. दिवसेंदिवस गुणवत्ता वाढत चालत असल्याचा दावा या आकडेवारीच्या आधारे केला जातो.
िहगोलीत दहावीचा निकाल ८१ टक्के
औरंगाबाद विभागाचा दहावीचा निकाल जाहीर झाला असून िहगोली जिल्ह्याचा निकाल ८०.८३ टक्के लागला आहे. जिल्ह्यातील ३ जिल्हा परिषदेच्या शाळांचा निकाल १०० टक्के लागला.
जिल्ह्यात दहावीच्या परीक्षेला एकूण १२ हजार ७९७ विद्यार्थी बसले होते. त्यापकी विशेष प्रावीण्यासह १ हजार ४२१, प्रथम श्रेणीत ३ हजार ५२१, द्वितीय श्रेणीत ४ हजार ३४७, तर १ हजार ५५ असे एकूण १० हजार ३४४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. गतवर्षीच्या तुलनेत या वर्षीचा निकाल समाधानकारक लागला आहे.
तालुकानिहाय लागलेला निकाल : िहगोली- ८१.३१ टक्के, कळमनुरी- ७४.३५ टक्के, वसमत- ८३.४२ टक्के, सेनगाव- ८४.७१ टक्के तर औंढा नागनाथ ८३.६२ टक्के अशा प्रकारे निकाल लागला आहे. जिल्ह्यात १०० टक्के निकाल लागलेल्या शाळांमध्ये ३ जिल्हा परिषद शाळांचा समावेश आहे.
लातूरचा टक्का घसरला
शालांत परीक्षेच्या निकालात राज्याच्या सरासरीपेक्षा लातूरचा निकाल कमी लागला. टक्का घसरल्याचे समोर आले असले तरी कॉपीमुक्त अभियान पारदर्शीपणे राबवल्यामुळे गुणवत्तेतील सूज कमी झाल्याचे शिक्षण विभागातील मंडळींचे म्हणणे आहे.
दहावीच्या परीक्षेत राज्याचा सरासरी निकाल ८२.३२ टक्के आहे. लातूर विभागाचा निकाल ८१.६८ टक्के आहे. नांदेड जिल्हय़ाचा निकाल ७४.२९, उस्मानाबादचा ८४.७४ तर लातूरचा ८७.१४ टक्का एवढा आहे. लातूर विभागातून ९४ हजार ३०४ परीक्षार्थीनी परीक्षा दिली. त्यात मुलांच्या उत्तीर्णतेचे प्रमाण ७९.८३ तर मुलींच्या उत्तीर्णतेचे प्रमाण ८४.०७ टक्के आहे. मार्च २०१० च्या शालांत परीक्षेत लातूर विभागात अतिशय सक्षमपणे कॉपीमुक्त अभियान राबवले गेल्यामुळे दहावीचा निकाल सर्वात कमी म्हणजे ४६.६९ टक्के इतका लागला होता. त्यानंतर दरवर्षी निकालात वाढ होत असून या वर्षी तो ८१.६८ टक्के इतका लागला असल्यामुळे लातूरच्या वाढत जाणाऱ्या गुणवत्तेवर आपण समाधानी असल्याचे मंडळाचे अध्यक्ष नु. ही. मुल्ला व सचिव सचिन जगताप यांनी सांगितले.
या वर्षी परीक्षेच्या गरप्रकारात राज्याची सरासरी ०.०५ टक्के असून लातूर विभागाची मात्र ०.०२ टक्के इतकीच आहे. लातूर विभागातून एकही तोतया विद्यार्थी परीक्षेत आढळला नाही. विभागात २२ जणांवर कॉपी करताना आढळल्यामुळे निलंबनाची कारवाई करण्यात आली. त्यात नांदेड जिल्हय़ातील ६, लातूर जिल्हय़ातील ६ तर उस्मानाबाद जिल्हय़ातील १० विद्यार्थ्यांचा समावेश आहे.
लातूर विभागात एकूण १६३४ शाळा असून १०० टक्के निकाल लागलेल्या १०९ शाळा तर शून्य टक्के निकाल लागलेल्या १० शाळा आहेत. १० टक्केपर्यंत निकाल लागलेल्या ३, वीस टक्केपर्यंत ९, तीस टक्केपर्यंत ८, चाळीस टक्केपर्यंत २६ तर पन्नास टक्केपर्यंत निकाल लागलेल्या ५० शाळा आहे. ज्या शाळांचा निकाल शून्य टक्के लागला आहे त्यांची यादी प्राप्त होताच संबंधितांवर चौकशी करून कारवाई करण्यात येणार असल्याचे मंडळाच्या अध्यक्षांनी सांगितले.
धर्यधर विद्यार्थ्यांचे कौतुक
दहावीच्या परीक्षेच्या काळात कुटुंबावर व वैयक्तिक आलेल्या संकटाला तोंड देत विद्यार्थ्यांनी धाडसाने परीक्षा दिली. अशा धर्यधर विद्यार्थ्यांचे कौतुक होत आहे. उस्मानाबाद जिल्हय़ातील आळणी गावातील अनुजा कुलकर्णी या मुलीच्या वडिलांनी परीक्षेच्या आदल्या दिवशी गारपीट झाल्यामुळे आत्महत्या केली होती. अनुजाने ११ ते २ यावेळेत परीक्षा देऊन दुपारी ३.३० वाजता ती अंत्यसंस्कारास उपस्थित राहिली. लातूर शहरातील कृष्णा वसंत राठोड या विद्यार्थ्यांच्या वडिलांचे परीक्षेच्या आदल्या दिवशी निधन झाले होते. वडिलांच्या पाíथवावर अंत्यसंस्कार झाल्यानंतर कृष्णा स्मशानभूमीतून थेट परीक्षा केंद्रावर पोहोचला व ११.३० वाजता त्याने परीक्षा दिली. लातूरच्या परिमल शाळेतील एस. एस. धोंडगे या विद्यार्थ्यांची अपेंडिक्सची शस्त्रक्रिया झाली होती. शस्त्रक्रिया झालेली असतानाही त्याने परीक्षा दिली. अहमदपूर येथील श्रीराम विद्यालयाचा पी. एन. मडीकर या विद्यार्थ्यांवरही शस्त्रक्रिया करावी लागली होती. मात्र त्याचा बाऊ न करता त्याने परीक्षा दिली.
शहरातील डॉ. अजित जगताप यांच्या रुग्णालयात परीक्षेच्या दिवशी भल्या पहाटे अतुल कौंडराज चौंदळे या विद्यार्थ्यांवर शस्त्रक्रिया करावी लागली होती. सकाळी १० वाजता त्याची भूल उतरली व ११ वाजता त्याने परीक्षा देण्याचा निर्णय घेतला. परीक्षा मंडळाने रुग्णालयातच प्रश्नपत्रिका व उत्तरपत्रिका देऊन त्याची परीक्षा देण्याची व्यवस्था केली होती. विद्यार्थ्यांनी कठीण प्रसंगात परीक्षेला महत्त्व दिले. त्यांच्यासाठी आवश्यक त्या सुविधा परीक्षा मंडळाने उपलब्ध केल्याचे मंडळाच्या अध्यक्षांनी सांगितले.
परभणी जिल्ह्याचा दहावीचा निकाल ७९.१६ टक्के
राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने घेतलेल्या दहावी परीक्षेचा निकाल मंगळवारी जाहीर झाला. परभणी जिल्ह्याचा ७९.१६ टक्के निकाल लागला असून जिल्ह्यातील २० शाळेचा निकाल शंभर टक्के लागला आहे. पूर्णा येथील स्वामी समर्थ निवासी आश्रमशाळा व तुराबूल हक्क उर्दू हायस्कूल सेलू या दोन शाळेचा शून्य टक्के निकाल लागला. औरंगाबाद विभागात सर्वातकमी निकाल परभणी जिल्ह्याचा आहे.
दहावीच्या परीक्षेत परभणी जिल्ह्यात या वर्षीही मुलींनी बाजी मारली. एकूण ९ हजार ३७९ पकी ७ हजार ७९४ मुली उत्तीर्ण झाल्या. तर १३ हजार ४४० मुलांपकी १० हजार २७० उत्तीर्ण झाले आहेत. मुलांचे उत्तीर्ण होण्याचे प्रमाण ७६.४१ तर मुलींचे ८३.१० टक्के इतके आहे.
परभणी जिल्ह्यातील ३७५ शाळेतील २२ हजार ८१९ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. यापकी १८ हजार ६४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. यामध्ये विशेष प्रावीण्यासह ३ हजार १९०, प्रथम श्रेणीत ६ हजार १६५, द्वितीय श्रेणीत ६ हजार ९४३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. मुलींचे उत्तीर्ण होण्याचे प्रमाण ८३.१० तर मुलांचे ७६.४१ टक्के असे आहे.
परभणी जिल्ह्यातील परभणी तालुक्याचा निकाल ८४.७०, पूर्णा- ८०.१८, गंगाखेड-७६.३१, पालम-६९.७९, सोनपेठ- ६६.६०, जिंतुर-८१.३१, पाथरी ७२.६२, मानवत-६८.०५, सेलू ८१.२६ टक्के लागला आहे. परभणी जिल्ह्यात नऊ पकी सात तालुक्यांच्या ठिकाणी कस्तुरबा बालिकामंदिर ही शाळा कार्यरत आहेत. या शाळेचा निकाल पुढीलप्रमाणे : परभणी-६९.५७, पूर्णा-६०.८७, गंगाखेड-५०.००, जिंतूर-८८.८९, पाथरी-६६.६७, मानवत-८५.००, सेलू-७६.९२.
नांदेड जिल्ह्याचा निकाल ७४.२९ टक्के
कॉपीमुक्त वातावरणात परीक्षा घेतल्याने गतवर्षीच्या तुलनेत नांदेड जिल्ह्याचा निकाल कमी म्हणजे ७४.२९ टक्के इतका लागला आहे. जिल्ह्यातल्या १५ शाळांचा निकाल शंभर टक्के लागला असला तरी दोन जिल्हा परिषद शाळांचा निकाल शून्य टक्के लागला आहे.
दहावी परीक्षेसाठी ३६ हजार ३१८ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापकी ३५ हजार ८६७ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. एकूण २६ हजार ६४७ विद्यार्थी या परीक्षेत उत्तीर्ण झाले. त्यापकी ५ हजारांपेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी ९० टक्क्य़ांपेक्षा अधिक गुण घेऊन यशाची परंपरा कायम ठेवली. जिल्ह्याचा एकूण निकाल ७४.२९ टक्के लागला आहे. लातूर बोर्डातर्गत नांदेड, उस्मानाबाद व लातूर या तीन जिल्ह्यांचा समावेश आहे. सर्वात कमी निकाल नांदेड जिल्ह्याचा लागला आहे. १६१ खासगी विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. त्यापकी केवळ ४६ जणांना यश मिळवता आले. नांदेड जिल्ह्याच्या १६ तालुक्यांत सर्वाधिक निकाल बिलोली तालुक्याचा लागला आहे. तालुकानिहाय निकालाची टक्केवारी अशी : नांदेड-७९.३९, अर्धापूर-७२.११ भोकर-७५.६५, देगलूर-७४.७०, धर्माबाद-७६.९४, हदगाव- ६५.६६, हिमायतनगर-६८.७९, कंधार-७३.९९, किनवट-७३.९०, लोहा-७०.४९, माहूर ७०.२५, मुखेड-७५.००, मुदखेड- ६५.१२, नायगाव- ७०.६३, उमरी-६९.२१ टक्के.
उत्तीर्ण विद्यार्थ्यांमध्ये मुलींची सरशी झाली असून ७७.३५ टक्के मुली उत्तीर्ण झाल्या, तर मुलांच्या उत्तीर्णतेचे प्रमाण ७१.८२ इतके आहे. जिल्हय़ातल्या मुखेड व नायगाव तालुक्यातल्या दोन जि. प. शाळांचा निकाल शून्य टक्के लागला आहे. तर १५ शाळांचा निकाल शंभर टक्के लागला आहे.
नांदेड जिल्ह्यात तत्कालीन जिल्हाधिकारी डॉ. श्रीकर परदेशी यांच्या पुढाकाराने कॉपीमुक्त अभियान राबवण्यात आले होते. तीच परंपरा अजूनही कायम आहे. कॉपीमुक्त वतावरणात परीक्षा झाल्याने जिल्ह्याचा निकाल अन्य जिल्ह्यांच्या तुलनेत कमी लागला असला तरी जिल्ह्यातील विद्यार्थ्यांची खरी गुणवत्ता समोर आल्याचे मानले जाते. शिक्षणाधिकारी बाळासाहेब कुंडगीर, एकनाथ मडावी, विस्तार अधिकारी बंडू आमदूरकर, व्यंकटेश चौधरी यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे.
संग्रहित लेख, दिनांक 17th Jun 2014 रोजी प्रकाशित
बीड जिल्हय़ातही मुलींनीच मारली बाजी औरंगाबाद विभागात वाढला बीडचा टक्का
माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परिक्षेच्या निकालात राज्यातून मुलींनीच बाजी मारली आहे. बीड जिल्हय़ातूनही ९३.६२ टक्के मुली उत्तीर्ण झाल्या आहेत. मुलीच अव्वल ठरल्याचे निकालावरुन दिसून आले. बारावीप्रमाणेच दहावीच्या परिक्षेत ही औरंगाबाद विभागात बीडचा टक्का वाढला आहे.
First published on: 17-06-2014 at 05:12 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Marathwada ssc result