सत्ताधारी महाविकास आघाडी मध्ये शिवसेनेचे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस सोबतचे मतभेद अजून एका विषयावरून कदाचित तीव्र होऊ शकतात. गुरुवारी काँग्रेसच्या नेत्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेऊन महाराष्ट्रात NPRआणि NRC ची अंमलबजावणी होऊ नये अशी मागणी केली.
मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांनी दिलेल्या निवेदनात असे म्हणण्यात आले आहे कि बिहार मध्ये नितीश कुमार यांच्या जनता दल युनायटेडचे भारतीय जनता पक्षासोबत युती असून सुद्धा या सरकारनेही हा सदर कायदा राज्यात लागू न करण्याचा प्रस्ताव विधानसभेत मंजूर करून घेतला आहे. तसंच केंद्र सरकारला याबाबत सूचित केले आहे. NPR NRC चे पहिले पाऊल आहे. जनगणनेतल्या नोंदणी 2010 च्या जनगणनेमध्ये केल्या होत्या त्या स्वरुपात कराव्यात आणि NPR च्या स्वरूपात नकोत, अशी मागणी खान यांनी केली आहे. त्यामुळे याच धर्तीवर महाराष्ट्राच्या विधानसभेत सुद्धा ठराव मंजूर करावा असे खान म्हणाले.