लोकसत्ता प्रतिनिधी

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सोलापूर: सोलापुरातील अश्विनी ग्रामीण वैद्यकीय महाविद्यालयातील द्वितीय वर्षात शिकत असलेल्या एका विद्यार्थ्यांने रेल्वेगाडीखाली स्वतः झोकून देत आत्महत्या केली. सचिन श्रीमंत चौधरी (वय २३, मूळ रा. छत्रपती संभाजीनगर) असे आत्महत्या केलेल्या वैद्यकीय विद्यार्थ्याचे नाव आहे. आत्महत्येचे निश्चित कारण लगेचच समजू शकले नाही. या घटनेने चौधरी कुटुंबीयांना जबर मानसिक धक्का बसला आहे.

अक्कलकोट रस्त्यावरील कुंभारी येथील अश्विनी ग्रामीण वैद्यकीय महाविद्यालयाच्या वसतिगृहातून सचिन चौधरी हा सकाळी दहाच्या सुमारास एका वर्गमित्राची दुचाकी घेऊन बाहेर पडला आणि होटगीजवळील एका रेल्वेपुलाखाली जाऊन एका धावत्या रेल्वेखाली त्याने स्वतःला झोकून दिले. रेल्वे रुळावर त्याच्या शरीराचे दोन तुकडे पडले होते.

आणखी वाचा-“ओबीसी विरोधात बोलणाऱ्याचे हात-पाय कापून ठेवण्याची ताकद ठेवा”, बबनराव तायवाडेंचं वादग्रस्त विधान

सचिन चौधरी हा अतिशय हुशार विद्यार्थी होता. त्याचे वडील श्रीमंत चौधरी छत्रपती संभाजीनगरात बागायती शेती करतात. घरात सचिन हा मोठा मुलगा होता. बारावीला चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाल्यानंतर मोठा आर्थिक भार सोसून वडिलांनी सचिनला सैलापुरात अश्विनी ग्रामीण वैद्यकीय महाविद्यालयात एमबीबीएस वैद्यकीय पदवी अभ्यासक्रमासाठी प्रवेश मिळवून दिला होता. तो कुटुंबीयांमध्ये पहिलाच डॉक्टर होणार होता. प्रथम वर्षांत त्याने चांगले गुण घेतले होते. स्वभाव उत्तम असल्यामुळे त्याने महाविद्यालयात अनेक मित्र जोडले होते. परंतु त्याने आत्महत्या करण्यापर्यंत टोकाचे पाऊल का उचलले, हे स्पष्ट होऊ शकले नाही.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Medical student end his life by commit suicide mrj
First published on: 26-11-2023 at 19:32 IST