मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे सुपूत्र तसेच राज्याचे पर्यटन आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे हे नेहमीच राजकारणात सक्रीय असतात. आदित्य ठाकरे हे नेहमीच काही ना काही कारणामुळे चर्चेत असतात. सध्या आदित्य ठाकरेंचा क्रिकेट खेळतानाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. सध्या त्या व्हिडीओची प्रचंड चर्चा पाहायला मिळत आहे.

आदित्य ठाकरेंचा हा व्हिडीओ त्यांच्या वरळी मतदारसंघातील असल्याचे बोललं जात आहे. आदित्य ठाकरेंनी रविवारी वरळीत विविध विकासकामांचे उद्घाटन आणि भूमिपूजन केले होते. त्यानंतर सोमवारीही आदित्य ठाकरे हे वरळी मतदारसंघात फिरत असल्याचे पाहायला मिळाले.

यादरम्यान आदित्य ठाकरेंनी वरळीतील एका मैदानावर क्रिकेट खेळण्याचा आनंद लुटला. यावेळी आदित्य ठाकरेंनी पहिल्याच चेंडूवर षटकार मारला. त्यामुळे आदित्य ठाकरे ज्याप्रमाणे राजकीय क्षेत्रात सक्रीय आहेत, त्याप्रमाणे क्रिकेटच्या मैदानातही ते फार सक्रीय असल्याचे दिसत आहेत.

Balasaheb Thackeray Birth Anniversary: आदित्य ठाकरेंनी दिला आठवणींना उजाळा, शेअर केला आजोबांसोबत क्रिकेट खेळतानाचा ‘तो’ जुना फोटो

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आदित्य ठाकरेंचा हा व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत आहे. विशेष म्हणजे त्यांचा हा व्हिडीओ सध्या चर्चेत असल्याचे पाहायला मिळत आहे. मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीची संपूर्ण जबाबदारी आदित्य ठाकरे यांच्या खांद्यावर देण्यात आली आहे. उमेदवार निवडीपासून अगदी प्रचाराच्या रणनीतीपर्यंत सर्वकाही निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य आदित्य ठाकरे यांना देण्यात आले आहेत. त्यानिमित्ताने आदित्य ठाकरे हे प्रचंड सक्रीय झाले आहेत.