राज्यातील सरकारी अधिकारी-कर्मचारी यांना सरकारी कार्यालयात त्यांचे सहकारी कार्यालयात येणारे अभ्यागत यांच्याशी दूरध्वनी अथवा मोबाइल आदींवर किंवा बैठकीत संवाद साधताना ‘हॅलो’ या शब्दाऐवजी ‘वंदेमातरम’ असे संबोधावे, असे राज्य सरकारतर्फे सांगण्यात आले आहे. दरम्यान, आता मंत्री गुलाबराव पाटील यांनी याबाबत प्रतिक्रिया दिली. ”देशात राहायचं असेल तर वंदे मातरम् म्हणावेच लागेल”, असे ते म्हणाले.

हेही वाचा – “पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री असताना एकनाथ शिंदे…”; शिवसेनेची मुख्यमंत्र्यांवर सडकून टीका

काय म्हणाले गुलाबराव पाटील?

भुसावळ तालुक्यातील कंडारी, फुलगाव, कोठोरा व कठोरा बुद्रुक या चार गावाच्या १३ कोटी रुपये पाणीपुरवठा योजनेचे भूमिपूजन आज पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी गुलाबराव पाटील यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ”ज्या मातीत तुम्ही राहता, त्या मातीला तुम्ही नमन केले पाहिजे. देशात राहायचे असेल तर वंदे मातरम म्हणावे लागेल. वंदे मातरम म्हणणे काही चुकीचे नाही, अशी प्रतिक्रिया मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिली आहे.

हेही वाचा – “सचिन वाझे हे ‘मातोश्री’वर दर महिन्याला…”; शिंदे गटातील खासदार प्रतापराव जाधवांचा मोठा गौप्यस्फोट

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

”महाराष्ट्रातील जवळपास १७ हजार गावं आहेत. त्या गावातील पाणीपुरवठा योजनेच्या बीपीआर मंजूर करून त्यांना मंजुरी देण्यात आले आहे. २०२४ पर्यंत महाराष्ट्रातील एकही गाव पाण्यापासून वंचित राहणार नाही, हे धोरण ठरलेला आहे, त्या धोरणाप्रमाणे पहिला टप्पा आता पूर्णत्वास येत आहे”, असेही ते म्हणाले.