कराड : ‘ऑपरेशन सिंदूर’च्या यशाबद्दल आणि भारतीय सैन्य दलाच्या समर्थनार्थ शिवसेनेतर्फे पाटण शहरातून काढण्यात आलेल्या तिरंगा रॅलीत मंत्री शंभूराजेंसह प्रशासन, विद्यार्थी, नागरिकांनी भर पावसात देशभक्तीने भारलेला सहभाग नोंदवला.पाटण कृषी उत्पन्न बाजार समिती मैदानापासून रॅली सुरू झाली. पालकमंत्री शंभूराजे देसाई यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रारंभ झालेल्या पदयात्रेचा शहरातील प्रमुख रस्त्यांवरून मार्गक्रमण करत लोकनेते बाळासाहेब देसाई भवन, पंचायत समिती येथे समारोप झाला.

रॅली सुरू झाल्यानंतर काही वेळातच वळवाच्या पावसाला सुरुवात झाली. मात्र, अंगावर जलधारा झेलत नागरिकांनी तिरंगा अधिक उंच फडकावला. भारत माता की जय, जय हिंद, वंदे मातरम् घोषणांनी सारा परिसर दुमदुमला होता.तिरंगा रॅलीने पाटण तालुक्यातील विविध गावांमधून नागरिक, सामाजिक कार्यकर्ते, राजकीय पदाधिकारी, शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थी, महिला आणि ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. देशभक्तिपर गीते, घोषणा, ध्वजवंदन आणि देशप्रेमाने भारावलेली जनता यामुळे ही पदयात्रा राष्ट्रप्रेमाचे दर्शन घडवणारी ठरली.
कराडमध्ये तिरंगा बाईक रॅली

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, शिवसेनेतर्फे कराड शहरात तिरंगा बाइक रॅली काढण्यात आली. शिवतीर्थापासून सुरू झालेली ही रॅली शहरातून मार्गक्रमण करत विजयस्तंभास पुष्पहार अर्पण करून विसावली. या ठिकाणी हुतात्म्यांना अभिवादन करण्यात आले.