अलिबाग : पालीतील ग. बा. वडेर हायस्कुलमध्ये इयत्ता सातवीत शिकणाऱ्या अल्पवयीन मुलीचा शाळेतील जेष्ठ शिक्षकाने पेपर चालू असतांनाच सोमवारी (ता. २९) विनयभंग केला आहे. मंगळवारी (ता. ३०) सायंकाळी या शिक्षकावर पाली पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी की या मुलीचा गणित विषयाचा पेपर चालू असतांना या ज्येष्ठ शिक्षकाने तिचा विनयभंग केला. या आधी देखील त्याने असा प्रकार केला असल्याने मुलीच्या नातेवाईकांनी या शिक्षका विरोधात पाली पोलिस स्थानकात तक्रार दाखल केली. त्यानुसार पाली पोलीस ठाणे कॉ. गुन्हा रजिस्टर नंबर १२०/२०२ भा. द. वि. सं. कलम ३५४ (अ)(१) सह लैंगिक अपराधां पासून बालकांचे संरक्षण अधिनियम २०१२ चे कलम ८, ९ (एफ)(एम), १०नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस निरीक्षक विजय तायडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक तृप्ती बोराटे या करीत आहेत.
संग्रहित लेख, दिनांक 3rd Dec 2021 रोजी प्रकाशित
शिक्षकाकडून अल्पवयीन मुलीचा विनयभंग
या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस निरीक्षक विजय तायडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक तृप्ती बोराटे या करीत आहेत.
Written by लोकसत्ता टीम

First published on: 03-12-2021 at 00:29 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Minor girl molestation by teacher zws