उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केलेल्या विधानावरून गदारोळ सुरू आहे. बाबरी मशिद पाडण्यात कदापि शिवसैनिक नव्हते, असं वक्तव्य चंद्रकांत पाटील यांनी केलं आहे. चंद्रकांत पाटलांच्या विधानावरून आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. यावर शिवसेना ( शिंदे गट ) आमदार संजय शिरसाट यांनी भाष्य केलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नेमकं काय म्हणाले चंद्रकांत पाटील?

एका मुलाखतीत बोलताना चंद्रकांत पाटील म्हणाले, “बाबरी मशिदीचा ढाचा पडल्यावर बाळासाहेब ठाकरेंनी म्हटलं, याची जबाबदारी मी घेतो. जबाबदारी घेतो म्हणजे बाळासाहेब ठाकरे किंवा शिवसेना तिथे ढाचा पाडण्यासाठी गेली होती का? कारसेवक हे हिंदू होते. हे कारसेवक बजरंग दल आणि दुर्गा वाहिनीच्या नेतृत्वाखाली बाबरी पाडण्यासाठी गेले होते. बाबरी पाडली, त्यात कदापि शिवसैनिक नव्हते.”

हेही वाचा : “उद्धव ठाकरेंनी चर्चा न करता मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला, त्यामुळे…”, शरद पवारांनी व्यक्त केलं मत

यावरती संजय शिरसाट यांनी म्हटलं, “चंद्रकांत पाटील यांनी केलेल्या विधानात सांगितलं, शिवसेनाप्रमुख बाबरीच्या आंदोनात नव्हते, हे सत्यच… पण हे आंदोलन कोण्या एका पक्षाचे नव्हते. हिंदुस्थानातील प्रत्येक हिंदुधर्मीयांनी केलेलं ते आंदोलन होते. म्हणून कोणत्या एका पक्षाचा झेंडा त्या आंदोलनात नव्हता.”

हेही वाचा : राष्ट्रीय पक्षाचा दर्जा रद्द झाल्यावर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “याचा परिणाम…”

“बाबरी पाडल्यावर शिवसेनाप्रमुखांनी ठाम सांगितलं होते. जर बाबरी शिवसैनिकांनी पाडली असेल, तर त्याचा मला अभिमान आहे. एवढी हिंमत कोणत्याही पक्षाच्या नेत्यात नव्हती. त्यामुळे शिवसेनाप्रमुखांचा सहभाग किती होता, यावर भाष्य करण्याची गरज नाही,” असे परखड मतही संजय शिरसाट यांनी व्यक्त केलं.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mla sanjay shirsat on chandrakant patil statement balasaheb thackeray babari masjid ssa
First published on: 11-04-2023 at 19:00 IST