वाई:रयत क्रांती संघटनेचे नेते सदाभाऊ खोत हे चांगले चळवळीतले कार्यकर्ते होते.मात्र ते भाजप मध्ये जाऊन पार बिघडले.त्यांच्यात भाजपरुपी सैतान घुसल्याची टीका आमदार शशिकांत शिंदे यांनी साताऱ्यात केली. आमदार शशिकांत शिंदे यांनी सातारा येथे पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी रयत क्रांती संघटनेचे नेते सदाभाऊ खोत यांच्यावर जोरदार टीका केली.

राष्ट्रवादी काँग्रेस मधील फुटीचा परिणाम  परिणाम पुढील काळात पहायला मिळणार आहे. खासदार शरद यांच्यासोबत सातारा जिल्ह्यातील आम्ही दोघे, तिघेच राहिलो आहोत. आता पुन्हा एकदा पक्ष वाढविण्याचे काम आम्हाला करावे लागणार आहे. राष्ट्रवादीचे फुटलेले कुटुंब पुन्हा एकत्र आणण्यासाठी आम्हाला प्रयत्न करावा लागणार असल्याचे शिंदे म्हटले आहे.

हेही वाचा >>> कराड : समाजाला वेठीस धरणाऱ्यांना येत्या निवडणुकात धडा शिकवा; राज ठाकरे यांचे जनतेला आवाहन

सदाभाऊ खोत यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांच्यावर सैतान व त्यांना गोळ्या झाडणार का असे बोलून टीका केली होती. त्याला  आमदार शशिकांत शिंदे यांनी त्यांच्याच भाषेत उत्तर दिले . आम्हीही  शरद पवार यांचे कार्यकर्ते असून आम्ही ही बोलू शकतो. आम्ही कामगार चळवळीतील असून ते शेतकरी चळवळीतील आहेत. आमचे व त्यांचे चांगले ऋृणानुबंध आहेत. सदाभाऊ यांच्याकडे एक चांगला कार्यकर्ता म्हणून आम्ही बघत होतो. पण, भाजपमध्ये गेल्यानंतर ते बिघडले आहेत. भाजपमध्ये गेल्यानंतर भाजपरुपी सैतान त्यांच्यात घुसलाय. ते थेट  शरद पवार यांच्यावर टीक करायला लागले हे दूर्दैव आहे. राज्यातील राजकारणाची पातळी संपली आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

राजकारण आता खालच्या पातळीवर गेले असून हे भविष्यासाठी धोकादायक आहे. आरोप, प्रत्यारोप खालच्या पातळीवर येऊन करणे योग्य नाही. असेच चालू राहिले तर राजकारणाविषयी लोकांत तिटकारा निर्माण होईल, अशी भितीही त्यांनी व्यक्त केली.