सहकारी साखर कारखानदारी हा ग्रामीण भागातील अर्थकारणाचा कणा आहे. ऊस पिकामुळे शेतकरी सधन झाला असून शेतकऱ्यांची आर्थिक सुबत्ता वाढविण्यासाठी सहकारी साखर कारखानदारीला उभारी देण्यासाठी केंद्र सरकारने व्यापक धोरण राबवावे, अशी मागणी अजिंक्यतारा सहकारी साखर कारखान्याचे मार्गदर्शक संचालक आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी केंद्रीय उद्योग व व्यापार मंत्री पियुष गोयल यांच्याकडे केली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा- “तर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री राजभवनाच्या दरवाज्यावर लाथ मारून…” संजय राऊतांचं मोठं विधान!

आमदार शिवेंद्रसिंहराजे यांनी दिल्ली येथे गोयल यांची भेट घेऊन राज्यातील सहकारी साखर कारखानदारीसमोरील अडचणी विशद केल्या. यावेळी अजिंक्यतारा कारखान्याचे कार्यकारी संचालक जिवाजी मोहिते, सी.ए. शैलेंद्र जयस्वाल आदी उपस्थित होते.

हेही वाचा- उर्फी जावेद प्रकरण तापलं, चित्रा वाघ यांना महिला आयोगाची नोटीस; चाकणकर म्हणाल्या, “दोन दिवसांत…”

महाराष्ट्रात ऊस हे मुख्य पीक असून उसाच्या शेतीचे प्रमाण जास्त आहे. त्यामुळे महाराष्ट्रामध्ये सहकारी साखर कारखान्यांची संख्या अधिक आहे. हे सहकारी साखर कारखाने सक्षमपणे चालू राहिले पाहिजेत तरच ऊस उत्पादक शेतकऱ्यांचा फायदा होणार आहे. आज सहकारी साखर कारखान्यांपुढे अनेक अडचणी आहेत. त्या प्राधान्याने सोडवणे आवश्यक आहे. सहकारी साखर कारखाने सक्षमपणे चालू राहावेत आणि त्यामाध्यमातून शेतकऱ्यांची अधिकाधिक आर्थिक उन्नती व्हावी, यासाठी ठोस उपाययोजना केंद्र सरकारने राबवाव्यात, अशी आग्रही मागणी शिवेंद्रसिंहराजे यांनी गोयल यांच्याकडे केली. सविस्तर चर्चेनंतर गोयल यांनी सहकारी साखर कारखानदारीला उर्जितावस्था मिळण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना राबविण्याबाबत सकारात्मकता दर्शवली.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mla shivendra singh rajes request to piyush goyal to implement a comprehensive policy for cooperative sugar factories dpj
First published on: 06-01-2023 at 19:38 IST