मुंबई : गोरगरिबांना चांगले घर उपलब्ध करुन देऊन शहर झोपडपट्टीमुक्त करण्यासाठी राज्य सरकार प्रयत्न करीत असून केंद्र सरकारच्या जमिनींवरील झोपडपट्टीवासियांचेही त्याच जागी पुनर्वसन करण्यासाठी केंद्राकडूनही जमीन देण्यात येत आहे. उद्धव ठाकरे यांनी महापालिकेत सत्ता असताना गेल्या २५ वर्षांत मुंबईसाठी केलेले एक चांगले काम दाखवावे, असे आव्हाने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी दिले.

केंद्रीय वाणिज्य मंत्री आणि उत्तर मुंबईतील महायुतीचे उमेदवार पियूष गोयल यांच्या कांदिवलीतील प्रचार कार्यालयाचे उद्धाटन फडणवीस यांच्या हस्ते बुधवारी करण्यात आले. त्यानंतर झालेल्या सभेत फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीकास्त्र सोडले. गोयल यांना विक्रमी मतांनी विजयी करण्याचे आवाहन करुन फडणवीस म्हणाले,  ‘गरिबी नाही, तर गरीबांना हटवा ’ , असे काँग्रेसचे धोरण आहे. महायुतीने मात्र झोपडपट्टीवासियांना त्यांच्या जागेवरच चांगले घर उपलब्ध करुन देण्याचा संकल्प केला आहे. ज्यांच्या झोपडय़ा केंद्र सरकारच्या जमिनींवर आहेत, त्यांच्यासाठी केंद्रानेही जमिनी देण्यास मान्यता दिली आहे. देशातील सर्वसामान्यांच्या जीवनाचा कायापालट करण्यासाठी किंवा आमूलाग्र परिवर्तन घडविण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी ही गेली १० वर्षे अथकपणे प्रयत्न करीत आहेत. पुढील काळातही देशाच्या प्रगतीचे इंजिन वेगाने पुढे जावे, असे वाटत असेल, तर मोदींच्या मागे सर्वानी खंबीरपणे उभे रहावे. महायुतीच्या उमेदवाराला मत म्हणजे, मोदींना मत असून विरोधात मत म्हणजे राहुल गांधींना मत आहे, हे सर्वानी लक्षात ठेवावे, असेही फडणवीस म्हणाले. यावेळी मुंबई उपनगर पालक मंत्री मंगलप्रभात लोढा, मुंबई भाजप अध्यक्ष आमदार अ‍ॅड. आशिष शेलार, खासदार गोपाळ शेट्टी, उत्तर प्रदेशचे माजी राज्यपाल राम नाईक, आमदार अतुल भातखळकर आदी उपस्थित होते.

Chhagan Bhujbals suggestion on traffic congestion in Dwarka Chowk
हाजीअली चौकातील धर्तीवर उपायांची गरज, द्वारका चौकातील वाहतूक कोंडीवर छगन भुजबळ यांची सूचना
Unannounced shutdown in Kalyan city due to Prime Minister Narendra Modis meeting
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सभेने कल्याण शहर अघोषित बंद
Malabar Hill, Malabar Hill Residents , made unique manifesto, Malabar Hill resident manifesto, Demand Action on Parking, Demand Action on Traffic, arvind sawant, Lok Sabha Elections, Mumbai news, malbar hill news, marathi news,
नेत्यांसाठी रस्ते बंद करू नका, मलबार हिलवासियांचा अनोखा जाहीरनामा; मुख्यमंत्र्यांवर रहिवासी नाराज
Kolhapur, Dr. Narendra Dabholkar, Nirbhay Padabhramanti, Kolhapur news, marathi news, Honour Dr. Narendra Dabholkar,
डॉ. नरेंद्र दाभोलकर यांना अभिवादन करण्यासाठी निर्भय पदभ्रमंती
dps ponds, Report on DPS ponds, Union Ministry of Environment Forests Climate Change marathi news
डीपीएस तलावप्रकरणी अहवाल द्या; केंद्रीय पर्यावरण, वने, हवामान बदल मंत्रालयाचे राज्य सरकारला निर्देश
Chandrapur, MIDC,
चंद्रपूर : एमआयडीसीतील बंद कारखाने बनले असामाजिक तत्त्वांचा अड्डा
Rajnath Singh
“PoK ताब्यात घेण्यासाठी बळाचा वापर करण्याची गरज नाही, कारण…”, संरक्षण मंत्र्यांचं महत्त्वाचं विधान
Resident doctors, attacked,
दीड वर्षात निवासी डॉक्टरांवर नऊ वेळा हल्ले, सुरक्षा व्यवस्था भक्कम करण्यासाठी ‘मार्ड’चे राज्य सरकारला पत्र