वाई: सातारा पालिकेने हद्दवाढ भागात मिलकत धारकांना चुकीच्या पद्धतीने घरपट्टी आकारण्यात आली आहे. ही वाढीव घरपट्टी ताबडतोबीने रद्द करा यासाठी आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले आक्रमक झाले.त्यांनी पालिकेत जाऊन मुख्याधिकाऱ्यांसह अधिकाऱ्यांना धारेवर धरले.

आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी आज हद्दवाढ भागातील नागरिकांसह सातारा पालिकेत जाऊन मुख्याधिकारी अभिजित बापट यांच्याशी चर्चा केली. पालिकेने चुकीच्या पद्धतीने घरपट्टीची आकारणी केली आहे.

हेही वाचा… दसरा, दिवाळी, छठसाठी ३० विशेष गाड्या

शिवेंद्रसिंहराजे म्हणाले, सातारा पालिकेच्या हद्दवाढ झालेल्या भागात चुकीच्या पद्धतीने घरपट्टी आकारणी झाली आहे. यावर उपाय म्हणून पालिकेने त्या-त्या भागात कॅम्प लावावेत. तसेच नागरिकांचे प्रबोधन करावे व त्यानंतर जागेवरच घरपट्टी भरून घ्यावी, अशी सूचना केली होती. याबाबत उदयनराजे यांच्या सातारा विकास आघाडीच्या नेत्यांनी याचे उत्तर द्यावे, असेही त्यांनी ठणकावले.आजपर्यंत या आघाडीच्या नेत्यांनी पालिकेला लुटले, त्यांनी उत्तर द्यावे. आलेली घरपट्टी रद्द करावी व योग्य पद्धतीने आकारणी करावी. या संदर्भात निर्णय झाला नाही.याबाबत तातडीने निर्णय झाला नाही, तर येत्या हिवाळी अधिवेशनात लक्षवेधी मांडून चुकीची बिले काढणाऱ्या अधिकाऱ्यांना निलंबित करण्याची मागणी करणार असल्याचा इशारा त्यांनी दिला.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पालिकेच्या अधिकाऱ्यांनी त्यांचे म्हणणे ऐकून घेतले व हद्दवाढ भागात घरपट्टी अकारणीची पद्धत त्यांना विशद केली.तरीही घरपट्टीसारखा महत्त्वाचा विषय असताना सातारा विकास आघाडीचे नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष नगरसेवक कुठे आहेत, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. तसेच सातारा विकास आघाडीच्या नेत्यांनी याचे उत्तर द्यावे.अन्यथा हिवाळी अधिवेशनात लक्षवेधी मांडून चुकीची बिले काढणाऱ्यांना निलंबित करावे, अशी मागणी करणार असल्याचे त्यांनी सांगितले.