सांगली: आमदार सुधीर गाडगीळ यांनी सांगलीसाठी २ हजार ६५० कोटींचा निधी उपलब्ध केल्याचा दावा म्हणजे खोटारडेपणाचा कळसच असल्याची टीका काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांनी पत्रकार बैठकीत केली.

आमदार गाडगीळ यांनी दोन दिवसापुर्वी सांगलीसाठी गेल्या चार वर्षात विविध योजनांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात निधी आणल्याचा दावा केला होता. या दाव्याचा प्रतिवाद श्री. पाटील यांनी पत्रकार बैठकीत केला. विकास कामामध्ये खासदार संजयकाका पाटील, पालकमंत्री सुरेश खाडे आणि महाविकास आघाडी सरकारचेही योगदान असल्याचे सांगत सांगलीसाठी जिल्हा रूग्णालयात ५०० खाटांचे रूग्णालय उभारण्याचा निर्णय माझ्या निवेदनावर तत्कालिन वैद्यकीय शिक्षण मंत्री देशमुख यांच्या कालखंडात झाला होता. तसेच मिरजेत शिशु व महिला रूग्णालय उभारण्यासाठी ४६ कोटी ४० लाख रूपयांचा निधी पालकमंत्री खाडे यांच्या प्रयत्नातून उपलब्ध झाला आहे. तर लोहमार्गावरील पूलासाठी खासदार पाटील यांचे प्रयत्न केंद्रिय पातळीवर मोलाचे ठरले असताना आमदार गाडगीळ मात्र सर्व मीच केले असे सांगण्याचा केविलवाणा प्रयत्न करीत आहेत असा आरोप त्यांनी केला.

हेही वाचा… “सुप्रिया सुळेंना जवळचा चष्मा!”; ‘अदृश्य शक्ती’वरून गोपीचंद पडळकरांची टीका म्हणाले, “बारामती आरक्षित…”

विकास कामाचे प्रस्ताव सादर करणे, ते मंजूर करण्यासाठी आग्रह धरणे हे काम नियमित काम असून यापेक्षा सांगलीचे महत्वाचे प्रश्‍नाबाबत विधीमंडळात काय प्रश्‍न उपस्थित केले आणि त्याची तड लावली याची माहिती त्यांनी द्यावी. विधीमंडळात त्यांनी महापालिकेपुढील कोणते प्रश्न मांडले हे सांगावे. तसेच मिरजेत शिशु व महिला रूग्णालय उभारण्यासाठी ४६ कोटी ४० लाख रूपयांचा निधी पालकमंत्री खाडे यांच्या प्रयत्नातून उपलब्ध झाला आहे. तर लोहमार्गावरील पूलासाठी खासदार पाटील यांचे प्रयत्न केंद्रिय पातळीवर मोलाचे ठरले असताना आमदार गाडगीळ मात्र सर्व मीच केले असे सांगण्याचा केविलवाणा प्रयत्न करीत आहेत असा आरोप त्यांनी केला.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

विकास कामाचे प्रस्ताव सादर करणे, ते मंजूर करण्यासाठी आग्रह धरणे हे काम नियमित काम असून यापेक्षा सांगलीचे महत्वाचे प्रश्‍नाबाबत विधीमंडळात काय प्रश्‍न उपस्थित केले आणि त्याची तड लावली याची माहिती त्यांनी द्यावी. विधीमंडळात त्यांनी महापालिकेपुढील असलेल्या समस्यांचा उहापोह करणे अपेक्षित आहे, तसेच कवलापूर विमानतळाबाबतही त्यांनी ठोस भूमिका घेतल्याचे दिसले नाही. मग आताच त्यांना श्रेय घेण्याची धावपळ करावी लागते यामागे त्यांना कशाची भीती आहे असा सवालही त्यांनी उपस्थित केला.