राज्यसभा निवडणुकीत भारतीय जनता पार्टीने महाविकास आघाडीला जोरदार धक्का दिला होता. त्यानंतर आता भाजपाने विधान परिषदेत निवडणुकीत देखील माविआला धोबीपछाड दिला आहे. भारतीय जनता पार्टीचे पाचही उमेदवार निवडून आले आहेत. तर राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेचे प्रत्येक दोन उमेदवार विजयी झाले आहेत. या निवडणुकीत काँग्रेसला जबरदस्त धक्का बसला असून दोन्ही उमेदवारांना पहिल्या पसंतीचा कोटा पूर्ण करता आला नाही.

भारतीय जनता पार्टीचे प्रसाद लाड आणि काँग्रेसचे उमेदवार भाई जगताप यांच्यात चुरसीची लढत होईल, असं चित्र दिसत होतं. पण हे दोन्ही उमेदवार विजयी झाले आहेत. मात्र काँग्रेसचे पहिल्या पसंतीचे उमेदवार चंद्रकांत हंडोरे यांना पराभवाचा सामना करावा लागला आहे. भाजपाला पहिल्या पसंतीची एकूण १३४ मतं मिळाली आहेत. तर महाविकास आघाडीची अनेक मतं फुटल्याची माहिती समोर येत आहे. दुसऱ्या आणि तिसऱ्या पसंतीच्या मतानुसार प्रसाद लाड यांनी विजयी बाजी मारली आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

विधान परिषदेचे विजयी उमेदवार…
राष्ट्रवादी काँग्रेस -रामराजे नाईक निंबाळकर (२९ मते ), एकनाथ खडसे (२८ मते)
शिवसेना – सचिन अहिर (२६ मते), आमशा पाडवी (२६ मते)
भारतीय जनता पार्टी– प्रवीण दरेकर (२९ मते), श्रीकांत भारतीय (३० मते), राम शिंदे (३० मते), उमा खापरे (२७ मते), प्रसाद लाड (२८ मते)
काँग्रेस -भाई जगताप (२६ मते), चंद्रकांत हंडोरे (पराभूत – २२ मते)