उद्धव ठाकरे गटातील नेत्या सुषमा अंधारे मागील काही दिवसांपासून चांगल्याच आक्रमक झाल्या आहेत. त्या भाजपा, शिंदे गट आणि मनसेवरदेखील कठोर शब्दांत टीका करत आहेत. सध्या त्यांची प्रबोधनयात्रा सुरू असून त्या संपूर्ण महाराष्ट्रभर दौरा करत आहेत. ही यात्रा कोल्हापुरात असताना अंधारे यांनी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. ‘लाव रे तो व्हिडीओ’ म्हणणं उर्मटपणा असल्याचे अंधारे म्हणाल्या आहेत. दरम्यान, अंधारे यांच्या याच टीकेला मनसेने जशास तसे उत्तर दिले आहे. मनसेचे नेते गजानन काळे यांनी सुषमा अंधारे यांचा एक जुना व्हिडीओ ट्विटरवर पोस्ट केला आहे.

हेही वाचा >>> Russia Ukraine War : रशियाकडून पोलंडवर क्षेपणास्त्र हल्ला? जो बायडेन यांनी बोलावली तातडीची बैठक

गजानन काळे यांनी पोस्ट केलेल्या या व्हिडीओमध्ये सुषमा अंधारे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यावर टीका करताना दिसत आहेत. याच व्हिडीओचा आधार घेत गजानन काळे यांनी अंधारेंना लक्ष्य केले आहे. ‘८०-८५ वर्षांच्या म्हाताऱ्याच्या हातात तलवार देऊन काय उपयोग आहे. हात थरथर करायला लागले आहेत. बाळासाहेब ठाकरे यांच्याबद्दल असे विधान करणे याला उर्मटपणा म्हणतात. महाढोंगी यात्रेत राजसाहेबांच्या ‘लावरे तो व्हिडिओ’ला उर्मटपणा म्हणण्याअगोदर राजकारणातील अलका कुबल यांनी हा व्हिडिओ बघावा,’ अशी खोचक टीका गजानन काळे यांनी केली आहे.

हेही वाचा >>> “अब तेरा क्या होगा कालिया?” भाषणातून सुषमा अंधारेंचे एकनाथ शिंदेंना खोचक चिमटे!

सुषमा अंधारे काय म्हणाल्या होत्या?

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सुषमा अंधारे सध्या महाप्रबोधन यात्रेच्या माध्यमातून उद्धव ठाकरे गटाला नवसंजीवनी देण्याचा प्रयत्न करत आहेत. आपल्या धडाकेबाज भाषणांच्या माध्यमातून त्या सभा जिंकत आहेत. १५ नोव्हेंबर रोजी कोल्हापुरात बोलताना त्यांनी राज ठाकरेंना टोला लगावला. ‘लाव रे तो व्हिडीओ’ हा त्यांचा उर्मटपणा आहे. आपण ‘दादा व्हिडीओ लाव म्हणू’ असे खोचक विधान सुषमा अंधारे यांनी केले होते.