वेदांत समूह आणि फॉक्सकॉन यांच्या भागीदारीतून तीन टप्प्यांत महाराष्ट्राकडे येणारी १ लाख ६६ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक गुजरातकडे वळली आहे. या गुंतवणूकीसाठी गुजरातची निवड केल्याचे वेदांत समूहाने जाहीर केलं आहे. यामुळे पूरक छोटे उद्योग आणि लाखोंच्या रोजगाराला महाराष्ट्राला मुकावे लागणार आहे. यावर आता मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

“वेदांत प्रकल्प गुजरातला जाणं हा चिंतेचा विषय आहे. एवढा मोठा प्रकल्प गुजरातला जातो, मग महाराष्ट्र नेमका कुठं कमी पडला. याचा विचार करण गरजेचं आहे. महाराष्ट्राची अधोगती होत असेल, तर तो चिंतेचा विषय आहे. महाराष्ट्राची परंपरा ही व्यावसायिक भिमुख राज्य अशी आहे. अनेक सवलती देऊन महाराष्ट्रात उद्योग आणले आहेत. असं काय घडलं की, हे प्रकल्प गुजरात हिरावून नेत आहे. याबाबत कठोरपणे समिक्षा करून निर्णय घेत, याची चौकशी करणं आवश्यक आहे. यापुढे अशा घटना घडू नये, यासाठी राजकारण विरहीत सगळ्या पक्षांनी विचार केला पाहिजे,” असे आवाहन संदीप देशपांडे यांनी केलं आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“मुंबई मराठी माणसांची…”

मागील काही दिवसांपासून मुंबईचे महत्व कमी केलं जात आहे का? यावर देशपांडे यांनी म्हटलं, “मुंबईकडे जे आहे ते अन्य राज्यांकडे नाही. मुंबई भारताची आर्थिक राजधानी आहे. कोणाला वाटत असेल, तरी मुंबईचे महत्व कमी होणार नाही आहे. मुंबई मराठी माणसांची आहे आणि राहिल. मुंबईकडे भौगोलिक दृष्ट्या काही फायदे आहेत,” असे संदीप देशपांडे म्हणाले.