भाजपा खासदार उदयनराजे भोसले यांनी सातारा शहरातील गोडोली येथे वाढदिवसानिमित्त आपल्या कार्यकर्त्यांला अनोख्या पद्धतीने पेढा भरवल्याची जोरदार चर्चा साताऱ्यात आहे.

गोडोली (सातारा)येथील कार्यकर्ते विनोद मोरे यांचा आज वाढदिवस आहे.या निमित्त त्यांनी कार्यकर्त्यांच्या परिसरात जाऊन त्याचा जंगी वाढदिवस साजरा केला. यावेळी कार्यकर्त्याचे कौतुक आपल्या तोंडातून अनोख्या पद्धतीने पेढा भरवला.उदयनराजेंची लोकप्रियता कार्यकर्त्यांमध्ये खूप आहे.त्यांचं कार्यकर्त्यांच्या दुचाकीवरून फिरणे,कॉलर उडविणे,कार्यकर्त्याच्या वाढदिवशी त्याची पप्पी घेणे अशा अनेक दिलखुश अदांवर कार्यकर्ते खुश असतात. त्यांचा एक नवीन व्हीडिओ समाज माध्यमावर चांगलाच प्रसारीत होत आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

खासदार उदयनराजे सातारा शहरातील गोडोली येथील कार्यकर्ते विनोद मोरे यांच्या वाढदिवसाला उपस्थित राहिले,त्याचा वाढदिवस साजरा केला आणि त्याला आपल्या अनोख्या पद्धतीने पेढा भरवत त्याचे कौतुक करत वाढदिवस साजरा केला. हा व्हिडीओ समाज माध्यमावर जोरदार फिरत आहे.त्याची सताऱ्यातही जोरदार चर्चा आहे.