मुंबई-गोवा महामार्ग हा १७ वर्षे झाले रखडलेला आहे. या मार्गासाठी आतापर्यंत १५ हजार ५६६ कोटी रुपये खर्च झाले आहेत. तरी रस्ता अद्याप अपूर्णच आहे. त्यामुळे रस्तानिर्मिती हा फक्त धंदा झाला आहे, अशी टीका महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केली. मुंबई-गोवा महामार्गावर मनसे कार्यकर्त्यांनी आंदोलने करावीत, की काम अपूर्ण ठेवण्याची हिंमत कोण करणार नाही, असा आदेश राज ठाकरे यांनी दिला.

“महाराष्ट्रात मनसे वगळता कोणताच राजकीय पक्ष जनतेच्या हिताकडे पाहात नाही. काही दिवसांपूर्वीच समृद्धी महामार्ग नागरिकांसाठी खुला झाला. मात्र, याच महामार्गावर आत्तापर्यंत ३५० नागरिक मृत्यूमुखी पडलेले आहेत, याला जबाबदार कोण? हा महामार्ग सुरू करताना लगेच टोलही सुरू केला. महाराष्ट्रातल्या जनतेची अवस्था म्हणजे ‘टोल भरा आणि मरा’ अशी झाली आहे,” असेही राज ठाकरे यांनी म्हटलं.

हेही वाचा : “खुनाचा आरोप होताच, राज ठाकरे फरार”, स्वत:च सांगितला जुना प्रसंग, म्हणाले…

“मुंबई-गोवा महामार्ग गेली सतरा वर्षे रखडला”

“केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दोघेही नागपूरचे असल्याने समृद्धी महामार्ग तात्काळ पूर्ण झाला का? दुसरीकडे मुंबई-गोवा महामार्ग गेली १७ वर्षे रखडलेला आहे, याला जबाबदार कोण?” असा सवालही राज ठाकरे यांनी उपस्थित केला आहे.

हेही वाचा : “मनसेचे १३ आमदार मटक्याच्या आकड्यावर…”, राज ठाकरेंची संतप्त प्रतिक्रिया

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“…सरकारला त्याचे काही देणं-घेणं नाही”

“मुंबईवरून निघाल्यानंतर पनवेल-पळस्पे मार्गे कोकणाकडे जाणाऱ्या रस्त्याची १७ वर्षापासून वाट लागलेली आहे. त्यामुळे कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांना मुंबईवरून पुणे-सातारा त्यानंतर यू-टर्न घेऊन पुन्हा कोकणाकडे जावे लागते. परंतु, सरकारला त्याचे काही देणं घेणं नाही,” असा हल्लाबोलही राज ठाकरे यांनी केला आहे.