Baba Siddique Shot Dead Breaking News : राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षाचे बाबा सिद्दीकी यांची १२ ऑक्टोबर रोजी शनिवारी रात्री साडेनऊच्या सुमारास हत्या झाली. झिशान सिद्दीकी यांच्या कार्यालयाबाहेर त्यांच्यावर गोळ्या झाडण्यात आल्या. त्यांना रुग्णालयात नेण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला होता. दरम्यान, याप्रकरणी अटक केलेल्या संशयित आरोपींची आता कसून चौकशी सुरू आहे. या चौकशीतून अनेक धक्कादायक खुलासे समोर येत आहेत. ANI ने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे.

पोलिसांनी आतापर्यंत दोन संशयित आरोपींना अटक केली आहे. त्यांना न्यायालयाने २१ ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. मुंबई गुन्हे शाखेकडून त्यांची चौकशी सुरू आहे. या चौकशीतून आरोपींकडून विविध माहिती समोर येत आहे. संशयित आरोपींनी दिलेल्या माहितीनुसार बाबा सिद्दीकी यांच्याबरोबरच झिशान सिद्दीकींचीही हत्या करण्याचा कट होता.

हेही वाचा >> Baba Siddique Shot Dead : बाबा सिद्दीकी यांच्या हत्येसाठी हल्लेखोरांनी पेपर स्प्रे का आणला होता? पोलीस म्हणाले…

संशयित आरोपींना दोघांनाही मारण्याची सुपारी दिली होती. दोघांपैकी जो दिसेल त्याच्यावर गोळीबार करण्याचे आदेश देण्यात आले होते, असं संशयित आरोपींनी पोलिसांना सांगितलं. तसंच, झिशान सिद्दीकी आणि बाबा सिद्दीकी यांना काही दिवसांपूर्वीच धमकी आली होती.

बिश्नोईशी कनेक्शन काय?

गुन्हे शाखेचे डीसीपी दत्ता नलावडे यांनी रविवारी सांगितले की, पोलिसांनी आरोपींकडून दोन पिस्तूल आणि २८ जिवंत राऊंड जप्त केले आहेत. या हत्येमध्ये लॉरेन्स बिश्नोईच्या कथित सहभागाची चौकशी चालू आहे. बाबा सिद्दीकी यांना वर्गीकृत सुरक्षा नव्हती पण त्यांना मुंबई पोलिसांकडून ३ सुरक्षा कर्मचारी देण्यात आले होते. घटनेच्या वेळी आमचा एक सुरक्षा कर्मचारी त्यांच्यासोबत होता. आम्ही सलमान खानसह या प्रकरणाची सर्व बाजूंनी चौकशी करत आहोत. लॉरेन्स बिश्नोईचे संदर्भही तपासले जात आहेत”, असंही ते म्हणाले.

पेपर स्प्रे का आणला होता?

“मुंबई क्राईम ब्रँचने दोन्ही आरोपींकडून दोन पिस्तुले जप्त केली. हल्लेखोरांनी पेपर स्प्रे आणला होता, आधी हल्लेखोर पेपर स्प्रे फवारणार होते आणि नंतर गोळीबार करणार होते पण तिसरा आरोपी शिवकुमार गौतम याने थेट गोळीबार सुरू केला. बाबा सिद्दीकी यांच्यासोबत तीन कॉन्स्टेबल होते. पण ते काही करू शकले नाहीत, या गोळीबारात आणखी एक जण जखमी झाला आहे”, अशीही माहिती पोलिसांनी दिली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

भारतीय न्याय संहिता (BNS) च्या कलम १०३(१), १०९, १२५, आणि ३(५) अन्वये निर्मल नगर पोलीस ठाण्यामध्ये शस्त्रास्त्र कायद्याच्या कलम ३, २५, ५ आणि २७ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला.