प्रसाद रावकर

केवळ देशातच नव्हे, तर जगात जिच्याबद्दल आकर्षण, कुतूहल असलेली मायानगरी मुंबई.. महाराष्ट्राची राजधानी आणि देशाची असलेली देशाची आर्थिक राजधानी.. वेगाने सुरू असलेली विकासकामे आणि पायाभूत सुविधांमुळे मुंबई कात टाकते आहे. शहरात मेट्रोचे जाळे विणण्याबरोबरच पूर्व आणि पश्चिम उपनगरे एकमेकांशी जोडण्यावर गेल्या काही वर्षांत भर दिला गेला. रस्त्यांसोबतच जलमार्ग व्यवहार्य ठरावा यासाठी प्रयत्न सुरू झाले. शहर अधिक गतिमान, आकर्षक करण्यासाठी प्रयत्न होत असून त्याला यश येताना दिसते आहे.

Delhi has the highest number of land transactions in the country
देशात जमिनीचे सर्वाधिक व्यवहार दिल्लीत
Return of unseasonal rains in the state
‘अवकाळी’चे पुनरागमन, राज्यातील ‘या’ भागात आज पुन्हा बरसणार…
no international airport pune city marathi news
पुणे : उद्योगांना पूरक पायाभूत सुविधांची बोंब!
discontent among people against ruling parties leaders in china
चिनी राज्यकर्त्यांविरुद्ध अफवांचा उच्छाद

मुंबईमध्ये शहर व उपनगर असे दोन जिल्हे आहेत. ही महसुली व्यवस्था असली तरी विकास कामांसह इतर बाबी प्रामुख्याने महापालिका आणि मुंबई महानगर क्षेत्रविकास प्राधिकरणातर्फे (एमएमआरडीए) हाताळल्या जातात. एकटय़ा महापालिकेचा अर्थसंकल्पच सुमारे ५२ हजार कोटींच्या आसपास, काही राज्यांपेक्षाही जास्त आहे. शिवाय ‘एमएमआरडीए’ची काही लाख कोटींची कामे सुरू आहेत. असे असताना शहर व उपनगर या दोन्ही जिल्ह्यांना वार्षिक निधीतून एक हजार कोटीही उपलब्ध होत नाहीत. मुंबईचे प्रश्न सोडविण्यात जिल्हाधिकारी कार्यालये किंवा अन्य सरकारी कार्यालयांची भूमिका मर्यादित आहे.

पाणीप्रश्न सोडविण्यासाठी खटपट
एकेकाळी सात बेटांच्या मुंबईची वेस वांद्र्यापर्यंत होती. मात्र देशभरातून मोठय़ा संख्येने बेरोजगार तरुणांचे लोंढे मुंबईत येत राहिले. पश्चिम उपनगरे दहिसपर्यंत, तर पूर्व उपनगरे मुलुंडपर्यंत विस्तारली. याचा ताण यंत्रणांवर आला. तानसा, मोडकसागर, मध्य वैतरणा, अप्पर वैतरणा, भातसा, तुळशी आणि विहार या सात धरणांमधून प्रतिदिन ३८०० दशलक्ष लिटर पाणीपुरवठा करण्यात येतो. मात्र दिवसेंदिवस लोकसंख्या वाढतच असताना तहान भागविण्याचे आव्हान आहे. ही बाब लक्षात घेऊन खाऱ्या पाण्याचे गोडय़ा पाण्यात रुपांतर करण्याच्या प्रकल्प विचाराधिन आहेत. त्याचबरोबर नदीजोड प्रकल्प, धरणे उभारणीचाही विचार सुरू आहे. त्यादृष्टीन पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. सांडपाण्यावर प्रक्रिया करून वापरासाठी पाणी उपलब्ध करून देण्यात येत आहे.

प्रदूषण नियंत्रणाचे प्रयत्न
विकासकामे, पुनर्विकास प्रकल्प, वाढती रहदारी यामुळे मोठय़ा प्रमाणावर धुळ उडत असते. याचा बंदोबस्त करण्यासाठी यांत्रिकी झाडुचा वापर करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्याचबरोबर रस्ते, पदपथांवरील धुळीस अटकाव करण्यासाठी स्प्रिंकलर्स खरेदी करण्याचा विचार सुरू आहे. त्याचबरोबर वायू शुद्धीकरण प्रणाली कार्यान्वित करण्यात येणार आहे. वाहनांमुळे वायू प्रदुषणात भर पडत आहे. त्यामुळे खासगी वाहनांचा वापर कमी व्हावा यादृष्टीने सार्वजनिक वाहतूस सेवेत वाढ करण्याचे नियोजन करण्यात येत आहे. ‘बेस्ट’ने बॅटरीवरील बसगाडय़ांची संख्या वाढविण्यास सुरुवात केली आहे. कचऱ्याबाबत नागरिकांमध्ये जनजागृती करण्यात येणार आहे. शहरी हरित प्रकल्पाअंतर्गत मुंबईत एक लाख वृक्ष लागवडीचा संकल्प सोडण्यात आला आहे.

रस्ते सुधारणेवर भर: मुंबईत सुमारे १९४१.१६ किलोमीटर लांबीचे रस्ते आहेत. त्यापैकी शहरात ५०६.४६ किलोमीटर, पश्चिम उपनगरात ९२७.६४ किलोमीटर तर पूर्व उपनगरांत ५०७.०६ किलोमीटर लांबीचे लहान-मोठे रस्ते आहेत. दरवर्षी पावसाळय़ात मुंबईतील रस्ते खड्डेमय होतात. मात्र आता सर्वच रस्त्यांचे काँक्रिटीकरण होत आहे. परिणामी आगामी काळात नागरिकांना खड्डेमुक्त रस्ते उपलब्ध होतील. महापालिकेने सागरी किनारा मार्ग प्रकल्पही हाती घेतला आहे. प्रिन्सेस स्टट्री येथून थेट कांदिवलीला हा मार्ग जाणार आहे. ११०.५८ किलोमीटर लांबीचा हा मार्ग असून त्यामध्ये भराव टाकून ४.३५ किलोमीटर रस्त्याची निर्मिती करण्यात येत आहे. त्याचबरोबर आंतरबदल, तटरक्षक भिंत, समुद्रालगत पदपथ भूमीगत वाहनतळ मनोरंजनासाठी स्वतंत्र जागा, बस टर्मिनल, बसथांबे आदी सुविधाचाही या प्रकल्पात समावेश आहेत.

उपनगरांची ‘जोडणी’:मुंबईतून शहर तसेच ठाणे जिल्ह्यातील उपनगरांमध्ये जलदगतीने पोहोचण्यासाठी मेट्रोचे जाळे विणले जात आहे. आजघडीला १४ मार्गिकांपैकी मेट्रो १, मेट्रो ७ आणि मेट्रो २ अ मार्गिका सेवेत दाखल झाल्या आहेत. काही मेट्रो मार्गिकांची कामे प्रगतीपथावर आहेत, तर काही मार्गिकांची कामे नजिकच्या काळात सुरू होण्याच्या बेतात आहेत. या सर्व मेट्रो मार्गिका सेवेत दाखल झाल्यानंतर मुंबई आणि महानगर प्रदेशात ३३७ किलोमीटर लांबीचे जाळे आकारास येईल. पूर्व आणि पश्चिम उपनगरांना परस्परांशी जोडण्यासाठी जोगेश्वरी-मुलुंड जोडरस्त्याचे काम सुरू आहे. त्याचबरोबर पश्चिम उपनगरांतून पूर्व उपनगरांमध्ये जाण्यासाठी पर्यायांची चाचपणी सुरू आहे. एल.बी.एस. मार्गाच्या रुंदीकरणाने वेग घेतला आहे.
नवी मुंबई विमानतळ, सागरी मार्ग: मुंबई विमानतळावरील भार कमी करण्याकरिता नवी मुंबईत दुसरे आंतरराष्ट्रीय विमानतळ आकारास येत आहे. शिवडी-न्हावाशेवा या २१ किमी. लांबीच्या सागरी मार्गामुळे वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होईल. मुंबई महापालिका, मुंबई महानगर क्षेत्रविकास प्राधिकरण, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ अशा विविध यंत्रणा मुंबईचा चेहरामोहरा बदलण्याकरिता प्रयत्नशील आहेत. मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाचे कामही आता जदलगतीने सुरू झाले आहे. नागरी सुविधांबरोबरच मुंबईकरांच्या विरंगुळय़ासाठी महापालिकेने ठिकठिकाणी उद्याने साकारली आहेत. वृक्षारोपणावर भर देऊन उद्याने आणि सार्वजनिक ठिकाणे हिरवीगार करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे.

क्षेत्रफळ: ४८३.१४ चौ. किमी.
लोकसंख्या: १,२८,७५,०००


मुख्य प्रायोजक : सारस्वत को. ऑप़ बँक लिमिटेड
पॉवर्ड बाय : सिडको, यूपीएल, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ (मर्या.)
नॉलेज पार्टनर : गोखले इन्स्टिटय़ूट, पुणे</p>