सध्या दिवाळी सणानिमित्त चाकरमानी आपापल्या मूळ गावी जात आहेत. याच कारणामुळे मागील काही दिवसांपासून रेल्वेस्थानकं आणि बसस्थानक परिसरात प्रवाशांची मोठ्या प्रमाणात गर्दी होताना दिसतेय. आपापल्या गावी जाण्यासाठी लोकांची लगबग असताना आता पश्चिम रेल्वेने मोठा निर्णय घेतला आहे. प्रवाशांची गर्दी लक्षात घेता पश्चिम रेल्वेने प्लॅटफॉर्म तिकीट दरात तब्बल ५ पटीने वाढ केली आहे.

हेही वाचा >>> पोलीस भरतीसंदर्भात देवेंद्र फडणवीसांची मोठी घोषणा; १८ हजार जागांसाठी जाहिरात निघणार!

पश्चिम रेल्वेने प्लॅटफॉर्म तिकीट वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार पश्चिम रेल्वेच्या काही रेल्वेस्थानकांवर प्लॅटफॉर्म तिकीट १० रुपयांवरून ५० रुपये करण्यात आले आहे. दिवाळीनिमित्त रेल्वेस्थानक परिसरात प्रवाशांची मोठी गर्दी होत आहे. हीच गर्दी लक्षात घेता हा निर्णय घेण्यात आला असून येत्या ३१ ऑक्टोबरपर्यंत हा निर्णय लागू असेल.

कोणत्या रेल्वेस्थानकांवर प्लॅटफॉर्म तिकीट दरवाढ

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पश्चिम रेल्वेने मुंबई सेंट्रल, दादर, बोरीवली, वांद्रे टर्मिनस, वापी, वलसाड, उढना, सुरत या रेल्वेस्थानकांवर प्लॅटफॉर्म तिकीट दरात वाढ केली आहे.