महिलेने तिच्या दोन मैत्रिणींना सोबत घेऊन पतीच्या प्रेयसीचा गळा दाबून खून केल्याची धक्कादायक घटना मुंबईमध्ये घडली आहे. पतीच्या प्रेयसीची हत्या केल्यानंतर या महिलेने मृतदेह कुर्ला येथील बंटर भवनासमोरील नाल्यात फेकला होता. शवविच्छेदन केल्यानंतर या महिलेचा गळा आवळून खून केल्याचे समोर आले आहे. आरोपी महिलेने मृतदेह गोणीत भरून तो नाल्यात टाकला होता. याबाबत नेहरूनगर पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आसून पोलीस याबाबत अधिक तपास करत आहेत.

हेही वाचा >>>> ‘आदिपुरूष’ चित्रपटाच्या वादात आता विश्व हिंदू परिषदेची उडी, दिग्दर्शकाकडे केली ‘ही’ मागणी

मिळालेल्या माहितीनुसार घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेजची पाहणी केली असता दोन महिलांनी रिक्षातून एक गोणी आणल्याचे समोर आले होते. रिक्षा चालकाचा शोध लागताच महिलेच्या खुनाचा उलघडा झाला. आरोपी मिनल पवार हिच्या पतीचे मयत महिलेशी कथित प्रेमसंबंध होते. याचाच राग आरोपी मिनल पवार या महिलेच्या मनात होता. मिनल पवारने तिची बहिण शिल्पा आणि मैत्रीण डॉली भालेराव यांच्या मदतीने ही हत्या केली.

हेही वाचा >>>> प्रेम संबंधात ठरत होती अडचण, सख्ख्या बहिणीनेच काढला काटा, अहमदनगर हादरले!

हत्या नेमकी कशी केली?

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आरोपी मीनलचा पती योगेशचे मयत महिलेशी प्रेमसंबंध होते. योगेशने आपल्या प्रेयसीला पत्नीची मैत्रीण डॉलीच्या घरी नेवून ठेवले होते. डॉलीने याची माहिती मीनलला दिली. त्यानंतर मीनल डॉलीच्या घरी गेली. मीनलने आपली बहीण शिल्पालाही सोबत घेतले. घरी पोहोचताच पतीच्या प्रेयसीचा मीनलने गळा दाबून खून केला. या वेळी डॉली आणि शिल्पाने तिला मदत केली. त्यानंतर मृत महिलेचा मृतदेह एका गोणीत भरून तो कुर्ला येथील बंटर भवन येथील नाल्यात आणून टाकला होता. मात्र पोलिसांनी याप्रकरणी चोवीस तासात तपास करून तिन्ही महिला आरोपींना अटक केली आहे.