कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्षपद सोडण्याचा निर्णय वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांनी घेतला आहे. तर बँकेला ऊर्जितावस्था आणण्यासाठी हसन मुश्रीफ यांनी प्रयत्न केले असल्याने तेच अध्यक्षपदी राहावेत, असा आग्रह कार्यकर्त्यांनी बुधवारी झालेल्या एका बैठकीत केला आहे.
सांगली येथे झालेल्या एका कार्यक्रमावेळी मंत्री मुश्रीफ यांनी गोकुळ दूध संघात मुलगा नवीद मुश्रीफ अध्यक्ष झाला आहे. एका घरात दोन मोठी पदे नसावी म्हणून जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देणार असल्याचे म्हटले होते. पूर्वी सुद्धा मुश्रीफ यांनी जिल्हा बँकेचे अध्यक्षपद सोडण्याचा निर्णय घेतला होता. पण आग्रहामुळे ते या पदावर राहिले होते.
कार्यकर्ते आक्रमक
मुश्रीफ यांनी अध्यक्षपद सोडण्याची भूमिका मांडल्यानंतर अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत त्यांनी अध्यक्षपद सोडू नये, अशी मागणी करण्यात आली. माजी आमदार के. पी. पाटील, हसन मुश्रीफ यांनी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना स्थैर्य मिळवून दिले आहे. पक्षाचे जिल्हाध्यक्ष बाबासाहेब पाटील -आसुर्लेकर यांनी मंत्री मुश्रीफ यांनी बँक नावारूपाला आणली आहे, असे सांगितले.