महापालिका निवडणुकीच्या तोंडावर शिवसेना आणि भाजपमधील संघर्ष तीव्र झाला असतानाच दुसरीकडे नगरपरिषद निवडणुकीत रामटेकमध्ये भाजपने शिवसेनेचा पराभव केला आहे. १७ पैकी १३ जागांवर विजय मिळवत भाजपने शिवसेनेला पाणी पाजले आहे. या नगरपरिषदेवर शिवसेनेची सत्ता होती. पण यंदाच्या निवडणुकीत शिवसेनेला फक्त २ जागांवर समाधान मानावे लागले.

रामटेक नगरपरिषदेत शिवसेनेची सत्ता होती. १७ पैकी १४ नगरसेवक शिवसेनेचे होते. पण यंदाच्या निवडणुकीत भाजपच्या तडाख्यासमोर शिवसेनेची वाताहत झाली. यंदा १७ पैकी तब्बल १३ जागांवर भाजपचे नगरसेवक निवडून आले आहेत. तर शिवसेना आणि काँग्रेसला प्रत्येकी २ जागांवर समाधान मानावे लागले. नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत भाजपचे दिलीप देशमुख विजयी झाले आहेत. रामटेकमध्ये शिवसेनेला बंडखोरीचा फटका बसल्याची चर्चा रंगली आहे.

congress in rajasthan loksabha (1)
जाट समाजाची भाजपावर नाराजी काँग्रेसच्या पथ्यावर?
bjp rajput voters in up
उत्तर प्रदेशमध्ये भाजपा अडचणीत! तिकीट वाटपावरून राजपूत समुदाय पक्षावर नाराज
spokesperson, Congress
काँग्रेसमध्ये जीव घुसमटणाऱ्या प्रवक्त्यांची भाजपमध्ये पोपटपंची !
Mehbooba PDP kashmir political parties
ओमर अब्दुल्ला मेहबूबा मुफ्तींवर का संतापले? पीडीपी जम्मू काश्मीरमध्ये पाच जागांवर लढणार

नरखेडमध्ये त्रिशंकू
नरखेडमधील निवडणुकीत त्रिशंकू स्थिती निर्माण झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसला ८ जागांवर विजय मिळाला आहे. तर शिवसेनेला ५ आणि अन्य पक्षांना ३ जागांवर विजय मिळाला आहे. नगराध्यक्षपदी नगरविकास आघाडीचे अभिजीत गुप्ता विजयी झाले आहेत.

कळमेश्वरमध्ये नगराध्यक्षपदी भाजपच्या स्मृती इखार
कळमेश्वरमधील निवडणुकीत भाजपला १६ पैकी चार जागांवरच विजय मिळाला आहे. पण नगराध्यक्षपदी भाजपच्या स्मृती इखार यांनी विजय मिळवला आहे. कळमेश्वरमध्ये काँग्रेसला १० तर शिवसेनेला २ जागांवर विजय मिळाला आहे.

मोहपामध्ये काँग्रेसचे वर्चस्व
मोहपामधील निवडणुकीत काँग्रेसने वर्चस्व कायम राखले आहे. १६ पैकी ९ जागांवर काँग्रेसचा विजय झाला असून नगराध्यक्षपदी काँग्रेसच्या शोभा कौटकर यांची निवड झाली आहे. शिवसेना भाजपला मोहपामध्ये सात जागांवर विजय मिळाला.