नगरचा योगेश पवार उत्तर महाराष्ट्र केसरी

सिन्नर (नाशिक) तालुक्यातील विंचुरीदळवी येथे नुकत्याच झालेल्या उत्तर महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत नगरच्या योगेश पवार याने मानाचा ‘उत्तर महाराष्ट्र केसरी’ किताब पटकावला.

सिन्नर (नाशिक) तालुक्यातील विंचुरीदळवी येथे नुकत्याच झालेल्या उत्तर महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत नगरच्या योगेश पवार याने मानाचा ‘उत्तर महाराष्ट्र केसरी’ किताब पटकावला. या किताबासह मानाची गदा व ५१ हजार रुपयांचे पारितोषिक त्याने जिंकले.
या किताबासाठी योगेश पवार व नाशिकचा हर्षवर्धन सदगीर या दोघांमध्ये अंतिम लढत झाली. योगेश पवार याने चौथ्या मिनिटाला सदगीरला चितपट करीत उत्तर महाराष्ट्र केसरीसह या मानाच्या गदेवर स्वत:चे नाव कोरले. उत्तर महाराष्ट्र कुस्तीगीर परिषद व जय बजरंग तालीम संघाच्या वतीने या स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या.  
योगेश हा नगर तालुक्यातील नेप्तीचा रहिवासी असून सध्या तो पुणे येथील आंतरराष्ट्रीय क्रीडा संकुलात कुस्तीचा सराव करीत आहे. त्याला तात्याराम पवार, मार्केट कमिटीचे माजी संचालक वसंत पवार, अर्जुन पुरस्कार विजेते मल्ल काका पवार, शिवछत्रपती पुरस्कारप्राप्त गोविंद पवार यांचे मार्गदर्शन लाभले. हा मानाचा किताब पटकावल्याबद्दल जिल्हा तालीम संघाचे अध्यक्ष वैभव लांडगे, खजिनदार नाना डोंगरे यांच्यासह अनेकांनी योगेशचे अभिनंदन केले. 

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Nagars yogesh pawar uttar maharashtra kesari