राज्य परिवहन विभागाचे राज्य शासनात विलीनीकरण करावे, या मागणीसाठी अडीच महिन्यापासून एसटी कर्मचारी संपावर आहेत. संपामुळे कर्मचाऱ्यांचे वेतन मिळालेले नसल्याने त्यांना मोठ्या प्रमाणात आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. अशा कर्मचाऱ्यांना मदत व्हावी यासाठी अभिनेते नाना पाटेकर आणि मकरंद अनासपुरे यांनी स्थापन केलेल्या ‘नाम फाउंडेशन’च्यावतीने धुळ्यातील २५० संपकरी एसटी कर्मचाऱ्यांना किराणा किटचे वाटप करण्यात आले.

यावेळी नाम फाउंडेशनचे धुळे जिल्हा समन्वयक प्रदीप पानपाटील यांच्या हस्ते ही मदत वाटप करण्यात आली. या किटमध्ये कर्मचाऱ्यांना एक महिना पुरेल एवढे साखर, चहा पावडर, तांदूळ, मिरची, हळद, चटणी, साबण, पेस्ट, दाळ इत्यादी वस्तू देण्यात आल्यात. यावेळी भूमिका मांडताना प्रदीप पानपाटील यांनी सांगितले की, “एसटी कर्मचाऱ्यांचा संप मील कामगारांप्रमाणे चिघळला आहे. त्यामुळेच आम्ही मदतीचा हात पुढे करत आहोत.”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“शासनाने या प्रकरणात योग्य ती भूमिका तातडीने जाहीर करुन कामगारांना न्याय देणे गरजेचे आहे. संपामुळे त्यांची आर्थिक परिस्थिती खालावत आहे. नैराश्य येत आहे. या प्रश्नाकडे शासनाने गांभीर्याने पाहण्याची गरज आहे,” असंही पानपाटील म्हणालेत.