सावंतवाडी : ‘‘शक्तिपीठ महामार्गाच्या समस्यांबाबत जिल्हाधिकाऱ्यांबरोबर बैठक आयोजित केली आहे. जनतेचे प्रश्न सोडवण्यात येतील. विरोधाला विरोध करणाऱ्यांना, विकासात आडवे येणाऱ्यांना फटके देऊ,’’ असे वक्तव्य खासदार नारायण राणे यांनी सोमवारी केले.

सावंतवाडी येथे भाजप कार्यालयात राणे आले असता त्यांना पत्रकारांनी प्रश्न विचारले, त्या वेळी विरोधाला विरोध करणाऱ्यांची आणि विकासात आड येणाऱ्यांची गय केली जाणार नाही, असा इशारा त्यांनी दिला. जंगल कोणी राखत नाही. ते आपोआप राखले जाते, वन्यजीव ते राखतात, असे विधान राणेंनी केले. राज आणि उद्धव ठाकरे एकत्र येत असल्याच्या बातमीबद्दल त्यांना विचारले असता त्याने काही फरक पडत नाही, ते महाराष्ट्राला काय देणार, असे राणे म्हणाले.