केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबाबत केलेलं विधान भोवलं आहे. राणे यांना या प्रकरणी दुपारी सव्वा तीनच्या सुमारास अटक करण्यात आली आहे. अटकेनंतर नारायण राणे यांनी टाइम्स नाऊशी बोलताना पहिली प्रतिक्रिया दिलीय. यामध्ये त्यांनी रात्र तुरुंगामध्ये काढावी लागण्यासंदर्भातील प्रश्नावर उत्तर दिलं आहे.

नक्की वाचा >> अटकेनंतर नारायण राणेंची पहिली प्रतिक्रिया, उद्धव ठाकरेंचा एकेरी उल्लेख करत म्हणाले…

मुलाखत घेणाऱ्या माहिलेने नारायण राणेंना अशाप्रकारे मंत्री असताना एखाद्या राज्याच्या पोलिसांनी नेत्याला अटक करण्याची ही महाराष्ट्रामधील बऱ्याच कालावधीतील पहिलीच घटना आहे असं सांगतानाच आता तुम्हाला संपूर्ण रात्र पोलीस कोठडीमध्ये काढावी लागेल असं विचारलं. त्यावर उत्तर देताना, “मला रात्रभर तुरुंगामध्ये रहावं लागेल असं मी काही वक्तव्य केलेलं नाही. मी जे म्हणालो आहे ते कायद्याच्या भाषेत ऑफेन्स होत नाही. तुम्ही याबद्दल कोणत्याही वकिलाला विचारु शकता. मला जबरदस्तीने लॉकअपमध्ये ठेवण्याचा प्रयत्न केला जातोय. यामध्ये माझा काहीच गुन्हा नाहीय,” असं राणे यांनी सांगितलं.

नक्की वाचा >> अटकेनंतर नारायण राणेंचा शिवसेनेला टोला; शिवसैनिकांच्या संख्येवरुन म्हणाले, “त्यांच्याकडे…”


उद्धव ठाकरेंना जे करायचं आहे ते करू…

अटक झाल्यानंतर या वृत्तवाहिनीला व्हि़डीओ कॉलच्या माध्यमातून प्रतिक्रिया देताना नारायण राणेंना उद्धव ठाकरेंना काय सांगाल असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर राणेंनी, “उद्धव ठाकरेंना जे करायचं आहे ते करू दे, मला जे करायचं आहे ते मी करेन,” असं उत्तर दिलं. मुलाखत घेणाऱ्या माहिलेने “उद्धव ठाकरेजी को क्या कहेंगे?”, असं विचारलं असता राणेंनी “कुछ नही कहुंगा…” असं म्हणत एकेरी उल्लेख करत उद्धव ठाकरेंना जे करायचं आहे ते करू दे, मला जे करायचं आहे ते मी करेन, असं उत्तर दिलं. “ते कायम थोडी मुख्यमंत्री राहणार आहेत, अशाप्रकारे ते कायद्याचा गैरवापर करणार असतील तर आम्ही सुद्धा राजाकरणामध्ये आहोत,” असं सूचक वक्तव्य राणेंनी केलं. यावेळीही त्यांनी मुख्यमंत्र्यांचा एकेरी उल्लेख केला.

नक्की वाचा >> नारायण राणेंना गाडीमध्ये बसून पोलीस घेऊन जात असतानाच निलेश राणेंनी…

अटक झाली तेव्हा काय घडलं?

अटक झाली तेव्हा नक्की काय घडलं याबद्दलही नारायण राणेंनी यावेळी भाष्य केलं आहे. “गोळवली येथील गोळवलकर गुरुजी स्मृती प्रकल्प येथे मी दुपारी तीन सव्वा तीनच्या सुमारास जेवत असतानाच अचानक तिथे डीसीपी आले आणि तुम्हाला अटक करण्यात येत आहे असं मला सांगितलं. मी त्यांना नोटीस दाखवा असं म्हटलं. तर त्यांच्याकडे नोटीस वगैरे नव्हती. त्यांनी जबरदस्तीने मला अटक करुन इथे संगमेश्वर पोलीस स्थानकामध्ये आणलं. त्यानंतर ते एका रुममध्ये गेले आणि दोन तास बाहेर आले नाहीत. मला त्यांचा हेतू चांगला वाटला नाही. माझ्या जीवाला धोका असल्याप्रमाणे त्याच्या हलचाली होत्या. नंतर तिथे अनेक अधिकारी आले. आता मला कोकणातील महाड येथे नेलं जात आहे,” असं राणे म्हणाले.