भाजपा नेते, माजी आमदार नरेंद्र पाटील यांनी वकील गुणरत्न सदावर्ते यांच्यासही मंत्री छगन भुजबळ यांच्यावर टीका केली आहे. सदावर्तेंची अक्कल आम्हाला माहिती आहे. सदावर्तेंनी आमचा नाद करू, असा इशारा देत भुजबळांनी कधी मराठ्यांना मदत केली? हे आजपर्यंत दिसलं नाही, असा हल्लाबोल नरेंद्र पाटलांनी केला आहे. ते तुळजापूरमध्ये तुळजाभवानीच्या दर्शनानंतर प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

“वकील गुणरत्न सदावर्ते यांनी माझ्या अटकेची मागणी केली. मला अटक करणं सोपे आहे काय. सदावर्तेंना फडणवीसांनी समज द्यावी. मराठ्यांच्या विरोधात जाऊन त्यांना अंगावर घेऊन नका. पंतप्रधानांनी याबाबत फडणवीसांना समज दिली पाहिजे,” असं विधान मराठा आंदोलक मनोज जरांगे-पाटील यांनी केलं होतं. यावर नरेंद्र पाटलांनी प्रतिक्रिया दिली.

हेही वाचा : “५० वर्षानंतर ब्राह्मण मुख्यमंत्र्यानं मराठा समाजाला आरक्षण दिलं”, भाजपा आमदाराचं विधान; जरांगे-पाटलांना प्रत्युत्तर देत म्हणाले…

“सदावर्तेंची अक्कल आम्हाला माहिती आहे. सदावर्तेंनी आमचा नाद करू नये. सदावर्तेंमुळे बाकीच्यांची नावं जोडली जातात. सदावर्ते स्वतंत्र व्यक्तिमत्व आहेत. देवेंद्र फडणवीसांचा सदावर्तेंशी काहीही संबंध नाही,” असं नरेंद्र पाटलांनी सांगितलं.

“देवेंद्र फडणवीसांनी मराठा समाजाला आरक्षण दिलं. यापूर्वीच्या मराठा समाजाच्या मुख्यमंत्र्यांनी आरक्षण का दिलं नाही? फडणवीसांनी आरक्षणाबाबत कुठेही टोलवा-टोलवी केली नाही. सदावर्ते आणि फडणवीसांची गोळाबेरीज करणं अयोग्य आहे,” असं नरेंद्र पाटील म्हणाले.

हेही वाचा : VIDEO : “…तेव्हापासून हिंदुत्ववादी म्हणून घेण्याचा अधिकार ठाकरेंना राहिला नाही”, एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“छगन भुजबळ कधीच मराठ्यांच्या बाजूनं नव्हते. कुठल्या मराठ्यांनी भुजबळांना मदत केली माहिती नाही. भुजबळांनी कधी मराठ्यांना मदत केली, हे आजपर्यंत दिसलं नाही. तर, भुजबळांनी मराठ्यांच्या प्रत्येक समितीला विरोध केला. मागील आणि आताच्या सरकारमध्ये भुजबळ मंत्रीमंडळात आहेत. मराठाद्वेषी आजही मंत्रीमंडळात आहेत. भुजबळांना त्यांच्या समाजाचं रक्षण करायचं आहे. आमचीही ताकद मोठी आहे,” असा इशारा नरेंद्र पाटलांनी दिला.