मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी औरंगाबाद जिल्हा परिषद इमारतीच्या भूमीपूजन कार्यक्रमात ‘व्यासपीठावर उपस्थित माझे आजी-माजी आणि एकत्र आलो तर भावी सहकारी’ असा उल्लेख केल्यामुळे राजकीय पटलावर नव्या चर्चेस तोंड फुटले आहे. या वेळी व्यासपीठावर केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे व इतर काही भाजपा नेते उपस्थित होते. त्यानंतर आता राज्याचे जलसंपदा मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी एक मोठं विधान केलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आजी-माजी आणि एकत्र आलो तर भावी सहकारी!

चंद्रकांत पाटील आणि रावसाहेब दानवे शिवसेनेत येण्याची शक्यता आहे. त्यामुळेच मुख्यमंत्र्यांनी सूचक विधान केलं असावं असं जयंत पाटील यांनी म्हटलं आहे. प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी केलेल्या या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात नवी चर्चा रंगली आहे.

“साहेब… मी पण फोडू का नारळ?”; उद्धाटन कार्यक्रमात सहा वर्षाच्या मुलाने जयंत पाटलांना केली विचारणा अन्…

“चंद्रकांत पाटील आणि रावसाहेब दानवे भाजपा सोडून शिवसेनेत जाण्याची शक्यता आहे. शिवसेनेत काही लोक येण्याची शक्यता असून तशी गडबड मला दोन दिवसात दिसत आहे. त्यामुळे हे दोन नेते शिवसेनेत येत असावेत. शिवसेनेत आल्याशिवाय त्यांना आजी होता येणार नाही,” असं जयंत पाटील यांनी म्हटलं आहे. जयंत पाटील यांनी यावेळी महाविकास आघाडी सरकार स्थिर असल्याचं सांगताना कोणतेही मतभेद नसल्याचं म्हटलं आहे. तसंच भाजपा नेते दोन वर्षांपासून असंच बोलत असून त्यांच्याकडे लक्ष देण्याची गरज नाही असा टोलाही त्यांनी लगावला.

जयंत पाटलांनी पूर्ण केली सहा वर्षाच्या मुलाची नारळ फोडण्याची इच्छा

जयंत पाटील यांच्या हस्ते वाळवा तालुक्यातील येडेनिपाणी ते बावची रस्ता, आष्टा- दुधगाव रस्ता, बागणी – ढवळी – बहादूरवाडी रस्ता, ढवळी ते कोरेगांव दरम्यान दोन लहान पुल, नागाव – भडखंबे – बहादूरवाडी फाटा रस्ता या विविध कामांचे शुभारंभ करण्यात आले. वाळवा तालुक्यातील भडखंबे येथे कार्यक्रम सुरू असताना सहा वर्षीय संचित गावडेही तिथे उपस्थित होता. आपल्या गावातील मोठी मंडळी नारळ फोडतानाचे चित्र पाहून संचितलाही याचं कुतूहल वाटलं. मोठी हिंमत करुन संचितने जयंत पाटील यांच्याकडे नारळ फोडण्याची इच्छा व्यक्त केली. यानंतर जयंत पाटील यांनीही त्याला नारळ फोडून देत इच्छा पूर्ण केली.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ncp jayant patil bjp raosaheb danve chandrakant patil shivsena uddhav thackeray sgy
First published on: 19-09-2021 at 15:36 IST