निवडणूक आयोगाने उत्तर प्रदेशसहित पाच राज्यांच्या निवडणुका जाहीर केल्या असून राजकीय पक्षांकडून तयारी सुरुवात झाली आहे. दरम्यान उत्तर प्रदेशातील विधानसभा निवडणुकीमुळे महाराष्ट्रातील राजकीय वातावरण चांगलंच तापलेलं दिसत आहे. याचं कारण म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांनी देशातील पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकांपैकी उत्तर प्रदेश, गोवा आणि मणिपूर या तीन राज्यांत निवडणुका लढवणार असल्याचं जाहीर केलं आहे. इतकंच नाही तर उत्तर प्रदेशप्रमाणेच गोव्यातही भाजपाच्या विरोधात वातावरण असल्याचे त्यांनी सांगितलं असून उत्तर प्रदेशात सत्ता परिवर्तन होईल असा विश्वास व्यक्त केला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

शरद पवार पंतप्रधान कधी होणार?; चंद्रकांत पाटलांच्या प्रश्नाला राऊतांनी दिलं उत्तर; “तुमच्यासारखी जी टेकाडं आहेत त्यांना…”

उत्तर प्रदेशात सत्ता परिवर्तन होईल आणि भाजपचे आणखी काही आमदार पक्षातून बाहेर पडतील, असे भाकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मंगळवारी व्यक्त केले. जनमत विरोधात जात असल्यानेच भाजपचे आमदार पक्षाला रामराम ठोकत असल्याचे मतही त्यांनी व्यक्त केलं.

छातीठोक भविष्यवाणी हे मनोरंजन आहे – चंद्रकांत पाटील

दरम्यान शरद पवारांच्या या वक्तव्यावरुन राज्यातील भाजपा नेते नाराजी जाहीर करत टीका करत आहेत. “ज्योतिष, कर्मकांड नाकारणारे शरद पवार आणि प्रबोधनकारांचा वारसा सांगणाऱ्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत भविष्यवेत्ते कधी झाले? उत्तर प्रदेश, गोव्यात सत्ता परिवर्तनाबाबत दावे समजू शकतो, पण छातीठोक भविष्यवाणी हे मनोरंजन आहे,” असा टोला चंद्रकांत पाटील यांनी ट्वीट करत लगावला आहे.

उत्तर प्रदेशात सत्ता परिवर्तन अटळ ! ; शरद पवार यांचे भाकीत: भाजपचे आणखी काही आमदार फुटणार

“या दोन्ही महापुरुषांना खरोखरच ज्योतिष अवगत असेल तर त्यांनी गोवा, उत्तर प्रदेशबद्दल बोलण्यापेक्षा महाराष्ट्राबाबत भविष्य सांगावं. राऊत यांनी सांगावं की, शरद पवार पंतप्रधान कधी होतील आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे घराबाहेर कधी पडतील? याची भविष्यवाणी पवारसाहेबांनी करावी,” असंही ते म्हणाले.

यादरम्यान आता राज्याचे गृहनिर्माण मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी ट्वीट करत पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला आहे. जितेंद्र आव्हाड यांनी नरेंद्र मोदींचा पोपटासोबतचा एक जुना व्हिडीओ ट्वीट करत टोला लगावला आहे. या व्हिडीओत नरेंद्र मोदी पोपटाला आपल्या हातावर घेण्याचा प्रयत्न करत असताना तो मात्र येत नसल्याचं दिसत आहे. तेथील कर्मचाऱ्याने प्रयत्न करुनही तो पोपट मोदींकडे जात नाही.

“फडणवीसांना माझा शब्द आहे, तुम्ही कितीही…,” संजय राऊतांनी दिलं जाहीर आव्हान

“उत्तर प्रदेशातील बहुजन समाजाचे भाजपा आमदार काय करणार याची भविष्यवाणी या पोपटाने कधीच केली होती,” असं आव्हाडांनी व्हिडीओ पोस्ट करताना म्हटलं आहे.

शरद पवार पंतप्रधान कधी होणार? चंद्रकांत पाटलांना संजय राऊतांचं उत्तर

“त्यांना योग्य वेळी माहिती देऊ. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे काम उत्तम सुरू आहे. येत्या १३ तारखेला पंतप्रधानांसोबत होणाऱ्या बैठकीत ते सहभागी होतील. शरद पवार यांच्याइतकी राजकारणाची, समाजकारणाची आणि व्यक्तिमत्वाची उंची आधी गाठा. तुमच्यासारखी जी टेकाडं आहेत त्यांना सह्याद्री किंवा हिमालयाच्या उंचीशी स्पर्धा करता येणार नाही,” असं प्रत्युत्तर संजय राऊत यांनी दिलं आहे.

“पंतप्रधान पदावर एखादा माणूस बसला म्हणून तो मोठा होत नाही. पंडित नेहरु, इंदिरा गांधी, लालबहादूर शास्त्री यांची उंची मोठीच होती. अनेकदा अनेक व्यक्ती त्या पदावर पोहोचू शकल्या नाहीत तरी त्यांची उंची कमी होत नाही,” अशा शब्दांत संजय राऊतांनी सुनावलं.

उत्तर प्रदेशात निवडणूक कधी?

राजकीय आणि देशपातळीवरही राजकीयदृष्ट्या महत्वाचं स्थान असलेल्या उत्तर प्रदेशात एकूण ४०३ जागांसाठी निवडणूक होणार आहे. १० फेब्रुवारीपासून सात टप्प्यात ही निवडणूक पार पडेल. उत्तर प्रदेशात १०, १४, २०, २३, २७ आणि ३ व १७ मार्चला मतदान होणार आहे. १० मार्चला मतमोजणी होईल. २०१७ मध्ये भाजपाने ४०३ पैकी ३१२ जागा जिंकत ऐतिहासिक विजयाची नोंद केली होती. समाजवादी पक्षाला ४७ तर बसपाला १९ आणि काँग्रेसला फक्त सात जागांवर विजय मिळाला होता.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ncp jitendra awhad tweet pm narndra modi video with parrot up assembly election 2022 sgy
First published on: 12-01-2022 at 16:39 IST