६ जिल्ह्यांचं पालकमंत्रीपद घेणारे कामं कशी करणार? अजित पवारांचा देवेंद्र फडणवीसांना टोला | ncp leader ajit pawar on deputy cm devendra fadnavis on 6 districts guardian minister baramati rmm 97 | Loksatta

फडणवीसांनी ६ जिल्ह्यांचं पालकमंत्रीपद घेतल्यावरून अजित पवारांचा खोचक टोला; म्हणाले…

देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पालकमंत्री म्हणून सहा जिल्ह्यांची जबाबदारी देण्यावरून अजित पवारांनी खोचक टोला लगावला आहे.

फडणवीसांनी ६ जिल्ह्यांचं पालकमंत्रीपद घेतल्यावरून अजित पवारांचा खोचक टोला; म्हणाले…
संग्रहित फोटो

महाराष्ट्रात एकनाथ शिंदे-देवेंद्र फडणवीस सरकार स्थापन झाल्यापासून राज्यातील जिल्ह्यांना पालकमंत्री कधी मिळणार? हा प्रश्न विरोधकांकडून सातत्याने विचारला जात होता. अखेर शनिवारी पालकमंत्र्यांची घोषणा झाली आहे. शिदे-फडणवीस सरकारमधील विविध नेत्यांकडे पालकमंत्रीपदाची जबाबदारी देण्यात आली आहे.

पण देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पालकमंत्री म्हणून सहा जिल्ह्यांची जबाबदारी देण्यात आली आहे. यावरून विधानसभा विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी देवेंद्र फडणवीसांना टोला लगावला आहे. माझ्याकडे पुणे जिल्ह्याचं पालकमंत्रीपद होतं, तर माझ्या नाकीनऊ येत होतं, ते सहा जिल्ह्यांचा कारभार कसा सांभाळणार आहेत? असा सवाल अजित पवारांनी विचारला आहे. ते बारामतीत बारामती सहकारी बँकेच्या ६१ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत बोलत होते.

हेही वाचा- “शिवतीर्थावर उद्धव ठाकरेंची सभा झालीच पाहिजे, पण…” शिंदे गटाचे नेते गुलाबराव पाटलांचं विधान चर्चेत

यावेळी अजित पवार म्हणाले की, शनिवारी शिंदे-फडणवीस सरकारने पालकमंत्र्यांची घोषणा केली. काही जिल्ह्यांमध्ये एकच पालकमंत्री दिले आहेत. तर काही पालकमंत्र्यांकडे दोन जिल्हे दिलेआहेत. माझ्या माहितीप्रमाणे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडे सहा जिल्हे देण्यात आले आहेत. माझ्याकडे पुण्याचं पालकमंत्रीपद होतं, तर माझ्या नाकी नऊ येत होतं. आठवड्यातून किमान एक दिवस मला जिल्ह्यासाठी द्यावाच लागत होता. त्यामुळे ज्यांच्याकडे सहा-सहा जिल्हे दिले आहेत, ते त्यांना कसं पेलवणार आहे, हे मला माहीत नाही, परंतु त्यांना माझ्या शुभेच्छा, असं अजित पवार भाषणात म्हणाले आहेत.

मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Next Story
फडणवीसांसोबत रात्री-अपरात्री बैठका, चर्चा..कसं ठरलं सगळं? शिंदे म्हणतात, “आमचे फोन टॅप..”!

संबंधित बातम्या

“पवनराजेंच्या मुलाशी ‘सामना’ झाला अन् आगीशी…”, निंबाळकरांनी पाटलांना डिवचलं; म्हणाले, “कधीही भिडायला तयार”
भाजपा नेत्याच्या शिवरायांवरील नव्या विधानानंतर संभाजीराजे संतापले; फडणवीसांचे नाव घेत म्हणाले “जमत नसेल तर…”
यवतमाळमध्ये एसटी बस आणि कारचा भीषण अपघात; चौघांचा जागीच मृत्यू, १३ प्रवासी गंभीर जखमी
‘शिवरायांचा जन्म कोकणात झाला’ वक्तव्यानंतर प्रसाद लाड यांची दिलगिरी; म्हणाले…
‘शिवाजी महाराजांचा जन्म कोकणात झाला’, प्रसाद लाड यांच्या विधानावर राज ठाकरेंची प्रतिक्रिया; म्हणाले, “शिवरायांकडून…”

व्हिडिओ

ताज्या बातम्या
सिद्धू मुसेवाला हत्येप्रकरणी दिलजीत दोसांझचं मोठं विधान; म्हणाला “सरकारचा नालायकपणा…”
Video: ‘या’ पक्षाची हिंमत तर बघा, चक्क मधमाश्यांच्या पोळ्यावर केला हल्ला अन् तितक्यात…
अमरेंद्र भास्कर बालकुमार साहित्य संस्थेच्या अध्यक्षपदी राजन लाखे यांची निवड; प्रक्रिया न राबविता घोषणा केल्याचा आरोप
हुशार कुत्रा! जेवण मिळवण्यासाठी मित्राला कसा चकमा दिला एकदा पाहाच
‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मधील विनोदवीराने दिली गुडन्यूज, बाळाचा व्हिडीओ केला शेअर