scorecardresearch

Premium

जितेंद्र आव्हाडांची भर पत्रकार परिषदेत शिवीगाळ, ‘या’ मुद्द्यावर ‘मुंब्रा बंद’चा इशारा

जितेंद्र आव्हाड यांनी भर पत्रकार परिषदेत भ वरुन सुरु होणारी शिवी दिली

Jitendra Awad
जितेंद्र आव्हाड

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी पत्रकार परिषदेत शिवीगाळ केल्याची घटना घडली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस हा महाविकास आघाडीतला घटक पक्ष आहे. संजय राऊत हे काही दिवसांपूर्वी खासदार श्रीकांत शिंदेंचं नाव घेताच थुंकले होते. त्यानंतर संजय शिरसाट यांचं नाव घेतल्यावरही थुंकले होते. मात्र आता राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी भ वरुन सुरु होणारी शिवी देत मुंब्रा बंदचा इशारा दिला आहे.

महाराष्ट्राचे पोलीस महासंचलाक, ठाण्याचे पोलीस आयुक्त यांनी गाझियाबादच्या आयपीएस अधिकाऱ्याने सांगितलेलं खरं आहे ते महाराष्ट्राला सांगावं अन्यथा आम्ही १ जुलैला मुंब्रा बंद करु. आमचं हे बोलणं मस्करीत घेऊ नका असा इशारा जितेंद्र आव्हाड यांनी दिला आहे. गाझियाबादच्या पोलिसांनी असा दावा केला आहे की ऑनलाईन गेमिंगच्या माध्यमातून मुंब्र्यातील ४०० मुलांचं धर्मांतर करण्यात आलं. हाच मुद्दा घेत जितेंद्र आव्हाड म्हणाले की ४०० मुलांच्या धर्मांतराचा जो आरोप होतो आहे त्यातली चार मुलं दाखवा ती मिळाली तर मी राजीनामा देईन. असं म्हणत त्यांनी शिवीगाळ केली आहे.

asim sarode on rahul narvekar (1)
“अध्यक्षांनी अपात्रतेबाबत चुकीचा निर्णय दिला, तर…”, कायदेतज्ज्ञ असीम सरोदेंचं मोठं वक्तव्य
Sharad Pawar NCP
“ते सहसा माझ्या शब्दाला नकार देत नाहीत”; शरद पवारांच्या वक्तव्याची जोरदार चर्चा, म्हणाले…
ajit pawar
‘दादा कचऱ्याची गाडी येत नाही’, भरकार्यक्रमात महिलेची तक्रार, अजित पवारांनी दिलं मिश्किल उत्तर, म्हणाले…
virat kohli
विराट कोहलीची विश्वचषकातून माघार? तातडीने मुंबईला रवाना झाल्याने चर्चांना उधाण

महाराष्ट्र शासनपुरस्कृत दंगली सध्या सुरु आहेत

महाराष्ट्रात सध्या जे काही सुरु आहे त्या दंगली शासन पुरस्कृत आहेत. गाझियाबादच्या एका आयपीएस अधिकाऱ्याने मुंब्रा या ठिकाणी ४०० मुलाचं धर्मांतर झाल्याचा दावा केला आहे. मुंब्र्याची ही बदनामी आहेच शिवाय हिंदू धर्मालाही बदनाम केलं जातं आहे. हिंदू धर्माची मुलं मूर्ख आहेत का धर्मांतर करायला? आयपीएस अधिकाऱ्याने पेपरवर संख्या दाखवावी. फक्त सनसनाटी निर्माण करण्यासाठी ही बातमी आहे असाही आरोप जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे. ही या मस्करी लावली आहे का? तुम्ही एका शहराला बदनाम करता आहात. या शहराची अर्थव्यवस्था धुळीस मिळवता आहात असंही आव्हाड यांनी स्पष्ट केलं.

तर मी राजीनामा द्यायला तयार

हिंदू धर्माचा अपमान करणारे हे कोण लोक आहेत? ४०० मुलांचं धर्मांतर केल्याचा दावा करत आहात. चार मुलं दाखवा, मी राजीनामा द्यायलाही तयार आहे असंही जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलं आहे त्याचवेळी त्यांचा तोल सुटला आहे आणि त्यांनी शिवीगाळ केली आहे.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Ncp leader jitendra awhad abuse in press conference over ghaziabad conversion case scj

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×