विरोधकांविरोधात तपास यंत्रणांच्या गैरवापरासंदर्भात राष्ट्रवादीच्या नेत्या विद्या चव्हाण यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर शाब्दिक हल्ला चढवला आहे. प्रामाणिक लोकांवर ईडी चौकशी लावणं आणि गुन्हेगारांना मंत्रीपद देणं, हेच मोदी सरकारचं काम असल्याचं चव्हाण यांनी म्हटलं आहे. बिल्किस बानो सामुहिक बलात्कार प्रकरणातील दोषींना तुरुंगातून सोडण्यावरही चव्हाण यांनी सरकारला लक्ष्य केलं आहे.

मुंबई : शिवसेना नेते व माजी मंत्री आदित्य ठाकरे यांचे नाव वापरून फसवणूकीचा प्रयत्न

“गुन्हेगारांना तुरुंगातून बाहेर सोडायचं आणि चांगल्या लोकांना तुरुंगात टाकायचं. हे भाजपाचं षडयंत्र आहे. त्यासाठी राष्ट्रीय तपास यंत्रणा कार्यरत झाल्या आहेत”, असा आरोप चव्हाण यांनी केला आहे. भाजपात प्रवेश नाकारणाऱ्यांवर ईडी चौकशी लावली जाते, असाही आरोप त्यांच्याकडून करण्यात आला आहे.

“सरकार पाडण्यासाठी ६ हजार ३०० कोटी खर्च केले नसते तर…”; केजरीवालांचा मोदी सरकारला टोला

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या आरोपांवर कॅबिनेट मंत्री चंद्रकांत पाटील यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. “भारतीय राज्यघटनेनुसार सीबीआय, ईडी, निवडणूक आयोग, आयकर विभाग या संवैधानिक संस्था आहेत. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या दूरदृष्टीतून या संस्थाची निर्मिती झाली आहे”, असे पाटील म्हणाले आहेत. घटनेअंतर्गत येणाऱ्या स्वायत्त संस्थावर माझ्यासारख्या जबाबदार व्यक्तीने बोलणं उचित नाही, असं सांगताना पाटील यांनी चव्हाण यांना टोला लगावला आहे.