महाराष्ट्रात सध्या गणेशोत्सवाचा उत्साह दिसून येत आहे. आपल्या लाडक्या बाप्पाची मनोभावे पूजा करताना भक्तमंडळी दिसत आहेत. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या घरीही बाप्पा विराजमान झाले असून अनेक मान्यवरांनी आत्तापर्यंत मुख्यमंत्र्यांच्या घरी बाप्पाचं दर्शन घेतलं आहे. यामध्ये राजकीय क्षेत्राप्रमाणेच कला, मनोरंजन क्षेत्रातील मंडळींचाही समावेश आहे. मात्र, मुख्यमंत्र्यांच्या शासकीय निवासस्थानी आलेल्या अशाच एका व्यक्तीमुळे महाराष्ट्राचा अवमान झाल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे.

काय म्हणाले आव्हाड?

आमदार जितेंद्र आव्हाड यांनी त्यांच्या अधिकृत ट्विटर हँडलवर यासंदर्भात एक पोस्ट टाकली आहे. या पोस्टबरोबर आव्हाडांनी एल्विश यादवचा एक व्हिडीओही पोस्ट केला आहे. यावरून जितेंद्र आव्हाडांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना लक्ष्य केलं आहे. “एल्विश यादव सारख्या कुप्रसिद्ध यूट्यूबर आणि सो कॉल्ड सोशल मीडिया इन्फ्ल्युएन्सरला या राज्याचे मुख्यमंत्री आपल्या शासकीय निवासस्थानी,गणेश आरतीसाठी बोलवत असतील,तर तो या पुरोगामी महाराष्ट्राचा अपमान आहे”, असं आव्हाडांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.

“राज ठाकरेंचं कौतुक करते, कारण…”, सुप्रिया सुळे यांचं विधान…

“या माणसाने महिलांच्याबाबतीत…”

“महिलांच्या बाबतीत अतिशय खालच्या स्तरावर जाऊन या माणसाने अनेक विधानं केली आहेत.याच्या मते,स्त्रियांना मेंदू कमी असतो. बाई ही फक्त चूल आणि मुलं सांभाळण्यासाठीच असते.तिने तेवढंच करावं असं हा म्हणतो. हा प्रकार म्हणजे सरळ सरळ फुले दाम्पत्य,शाहू महाराज,आंबेडकरसाहेब यांच्यासारख्या महान विभूतींनी स्त्रियांच्या उद्धराचं जे कार्य केलं आहे त्याचा अपमान आहे.पुरोगामी महाराष्ट्राला न शोभणारी ही घटना आहे”, असंही जितेंद्र आव्हाडांनी या पोस्टमध्ये नमूद केलं आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

काय आहे व्हिडीओमध्ये?

जितेंद्र आव्हाडांनी पोस्ट केलेल्या व्हिडीओमध्ये एल्विश यादव “मुलींनी फार विचार न करता घरातली कामं करावीत, आधीच कमी असणारी बुद्धी फार वापरू नये, फार विचार करू नये” अशी विधानं करताना दिसत आहे.