राज्यातील राजकारणातले वातावरण रोज गढूळ होत चाललं आहे, असं मत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी व्यक्त केलं होतं. यावरून खासदार सुप्रिया सुळे यांनी राज ठाकरे यांचं कौतुक केलं आहे. राज ठाकरे यांनी शिवसेनेत मतभेद झाल्यानंतर वेगळी चूल मांडली. पण, शिवसेनेवर हक्क सांगितला नाही. म्हणून राज ठाकरे यांचं कौतुक करते, असं सुप्रिया सुळे यांनी म्हटलं. तसेच, सुप्रिया सुळे यांनी भाजपावर टीकाही केली आहे. त्या दौंडमध्ये प्रसामध्यमांशी बोलत होत्या. सुप्रिया सुळे म्हणाल्या, "राज ठाकरेंनी शिवसेनेत मतभेद झाल्यानंतर वेगळा पक्ष स्थापन केला. पण, राज ठाकरे यांनी शिवसेनेवर हक्क सांगितला नाही. त्यामुळे राज ठाकरे यांचं कौतुक करते." हेही वाचा : “सरकार बदलतात, किंमत मोजावी लागणार”, संजय राऊतांचा राहुल नार्वेकरांना इशारा "या कटकारस्थानामागे दिल्लीतून अदृष्य हात आहेत. बाळासाहेब ठाकरे, शरद पवार यांचा अपमान करण्याचं पाप सतत केला जात आहे. दोघांचं यश भाजपाला सहन होत नाही. म्हणून मराठी माणसांचा अपमान भाजपा करत आहे," असेही सुप्रिया सुळे यांनी म्हटलं. हेही वाचा : “…तर शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांनी ‘इंडिया’ आघाडीची साथ सोडली पाहिजे”, भाजपाचं थेट आव्हान "दिल्लीचा अदृश्य हात महाराष्ट्राच्या विरोधात आहे. महाराष्ट्रातील राजकीय पक्ष, नोकऱ्या, गुंतवणूक हे सगळं दुसऱ्या राज्यात जात आहेत. देशात महाराष्ट्राचं महत्व कमी करण्याचं कटकारस्थान दिल्लीतील भाजपाचे अदृश्य हात करत आहेत," असा आरोपही सुप्रिया सुळे यांनी केला आहे.