मुंबई उच्च न्यायालयाने सीबीआय चौकशीचे आदेश दिल्यानंतर अनिल देशमुख यांनी गृहमंत्रीपदाचा राजीनामा दिला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी पत्रकार परिषद घेत अनिल देशमुखांच्या राजीनाम्याची माहिती दिली. “उच्च न्यायालयाने सीबीआय चौकशीचे आदेश दिल्यानंतर गृहमंत्री अनिल देशमुख यांनी शरद पवार यांना भेटून राजीनामा देणार असल्याची माहिती दिली. शरद पवारांनी यासाठी होकार दिला आहे,” असं नवाब मलिक यांनी सांगितलं.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अनिल देशमुखांनी गृहमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर भाजपाकडून पहिली प्रतिक्रिया
अनिल देशमुखांवरील आरोपांची सीबीआय चौकशी होणार; मुंबई हायकोर्टाचा मोठा निर्णय

“सीबीआय चौकशी करत असताना गृहमंत्री पदावर राहणं योग्य नाही असं देशमुख म्हणाले. त्यामुळे त्यांनी राजीनामा दिला. शेवटी आम्हाला न्यायालयाच्या आदेशाचा सन्मान ठेवणे गरजेचं आहे. राजीनामा दिला, विषय संपला,” असंही नवाब मलिक यांनी सांगितलं. दरम्यान अनिल देशमुख यांनी राजीनामा दिल्याने गृहमंत्रीपदी कोणाचा वर्णी लागणार याची चर्चा सुरु झाली आहे.

नवाब मलिक यांना गृहखात्याचा पदभार कोणाकडे असेल असं विचारण्यात आलं असता त्यांनी सांगितलं की, “एखाद्या मंत्र्याने राजीनामा दिल्यानंतर साहजिकच मुख्यमंत्र्यांकडे त्या खात्याची जबाबदारी असते. नंतर मुख्यमंत्री ही जबाबदारी दुसऱ्याकडे देतील. तीन पक्षांचं सरकार असताना चर्चा करुन जो निर्णय होईल तो स्वत: मुख्यमंत्री लोकांना सांगतील”.

अनिल देशमुखांचं ट्विट –
न्यायालयाने चौकशीचे आदेश दिले असल्याने गृहमंत्री पदावर राहणं मला नैतिकदृष्ट्या योग्य वाटत नाही. म्हणून मी स्वत:हून या पदापासून दूर राहण्याचा निर्णय घेत आहे असं अनिल देशमुख यांनी ट्विट करत सांगितलं आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ncp nawab malik on home ministry maharashtra cm uddhav thackeray anil deshmukh sgy
First published on: 05-04-2021 at 15:44 IST