केंद्रीय निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा राष्ट्रीय दर्जा काढून घेतला आहे. राष्ट्रवादीसह तृणमूल काँग्रेस आणि भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा राष्ट्रीय दर्जा काढून घेतला आहे. त्याचवेळी आम आदमी पक्षाला आता राष्ट्रीय दर्जा देण्यात आला आहे. राष्ट्रवादीचा राष्ट्रीय दर्जा काढून घेतल्यावर आता पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. ते ‘एबीपी माझा’शी बोलत होते.
शरद पवार म्हणाले, “राष्ट्रीय पक्ष याचा अर्थ एखाद्या पक्षाला ‘राष्ट्रीय’ पक्ष म्हणून मान्यता मिळते. त्यामुळे देशातील कोणत्याही राज्यात त्या पक्षाचा उमेदवार उभा राहिल्यास अधिकृत चिन्हावर निवडणूक लढता येते. तसेच, काही सवलती मिळतात.”




हेही वाचा : “उद्धव ठाकरेंनी चर्चा न करता मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला, त्यामुळे…”, शरद पवारांनी व्यक्त केलं
“राष्ट्रवादीची राष्ट्रीय पक्ष म्हणून असलेली मान्यता रद्द केली आहे. कारण, निवडणूक आयोगाचा निर्णय आहे, ४ राज्यांत ६ टक्के मते मिळायला हवीत. महाराष्ट्र, नागालँड आणि अंदमान-निकोबारमध्ये तेवढी मते पक्षाला आहेत. पण, अंदमान-निकोबारची मते आयोगाने ग्राह्य धरली नाहीत,” असे शरद पवारांनी म्हटलं.
हेही वाचा : “विरोधी पक्षातील सहकाऱ्यांना ‘जेपीसी’ चौकशी हवी असेल, तर…”, वाद झाल्यानंतर शरद पवारांनी मांडली भूमिका!
“याचा परिणाम उद्या कर्नाटकात निवडणूक झाल्यास, आमच्या उमेदवारांना चिन्ह मिळेल. मात्र, निवडणूक प्राचारादरम्यान राष्ट्रीय वाहिन्यांवर मिळणारी वेळ कमी होणार आहे. तसेच, प्रचारासाठी ४० लोक असतात. त्यातील ५० टक्के कमी होतील. हा फटका आम्हाला बसेल,” असे शरद पवारांनी सांगितले.