महाराष्ट्र राज्य शिक्षक पात्रता परीक्षेत उर्दू माध्यमातून घेतलेल्या परीक्षेच्या प्रश्नपत्रिकेत गेल्या वर्षी २१ चुका होत्या. उर्दूमध्ये एकही अक्षर इकडेतिकडे गेले तरी उत्तर बदलते, त्यामुळे यावर्षी उर्दू तज्ज्ञांशी सल्लामसलत केली. त्यांनीच हस्तलिखित स्कॅन केले तर स्वच्छ अक्षरात विद्यार्थ्यांना वाचता येईल आणि चुकाही होणार नाही, असे सुचवले. त्यामुळे त्यांच्याकडूनच ते लिहून घेतल्याचे स्पष्टीकरण शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी दिली.
यासंदर्भातला प्रश्न विक्रम काळे यांनी उपस्थित केला. हस्तलिखितामुळे गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली. त्यामुळे ही परीक्षा राज्यभरातून पुन्हा घेण्याची मागणी विक्रम काळे यांनी तारांकित प्रश्नाच्या माध्यमातून केली. त्यावर अशी कोणतीही तक्रार आलेली नाही. केवळ एका ईमेलमधून विद्यार्थ्यांने हस्तलिखिताचा प्रश्न उपस्थित केला. त्यामुळे पुन्हा परीक्षा घेण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. तरीही पुढच्या वर्षी यासंदर्भात चांगले प्रिंटर्स शोधू आणि छापील प्रश्नपत्रिका विद्यार्थ्यांना देऊ, असे आश्वासन तावडे यांनी दिले.
संग्रहित लेख, दिनांक 23rd Dec 2014 रोजी प्रकाशित
टीईटी पुन्हा घेण्याचा प्रश्नच नाही -तावडे
महाराष्ट्र राज्य शिक्षक पात्रता परीक्षेत उर्दू माध्यमातून घेतलेल्या परीक्षेच्या प्रश्नपत्रिकेत गेल्या वर्षी २१ चुका होत्या. उर्दूमध्ये एकही अक्षर इकडेतिकडे गेले तरी उत्तर बदलते, त्यामुळे यावर्षी उर्दू तज्ज्ञांशी सल्लामसलत केली.
First published on: 23-12-2014 at 12:05 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: News from nagpur winter session