धाराशिव: मागील लोकसभा निवडणुकीत ‘पावशेरसिंहां’ची कुवत अवघ्या जिल्ह्याला कळाली आहे. त्यावेळी ते वेगळ्या पक्षात होते. आज दुसर्‍याच पक्षात आहेत. कदाचित ते भविष्यातही तिसर्‍याच पक्षात असतील. अशा लोकांनी मला बोलू नये, अशा शब्दात खा.ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी आ.राणाजगजितसिंह पाटील यांना प्रतिटोला लगावला.

यावरुन ठाकरे शिवसेना व भाजप या दोन्ही पक्षांत चांगलेच वाक्युध्द पेटले आहे. आ.पाटील यांनी शनिवारी दुपारी पत्रकार परिषद घेत खा. राजेनिंबाळकरांचा उल्‍लेख ‘अर्धवटराव’ असा केला होता. त्यानंतर लागलीच प्रसिध्दी पत्रक काढून खा. राजेनिंबाळकरांनी आ. पाटील यांच्यावर जोरदार टिका केली. त्यांनी दिलेल्या पत्रकात म्हटले आहे, की  तुमची कुवत काय आहे हे लोकसभेच्या एका पराभवानंतर जिल्ह्याला दिसुन आले. दुसर्‍याला बोलण्या अगोदर आपण आत्मपरीक्षण करा. पाच वर्षापुर्वी आपण कोणाचे होता, आज कोणाचे आहात व भविष्यात अजुन कोणाचे व्हाल याची खात्री नसणार्‍यांनी मला बोलु नये. भुसंपादनाच्या प्रक्रियेत आपले कमीशन एजंटच धोरण राबवण्यात अडथळा आल्याने एवढा पोटशुळ सुटणं आम्ही समजु शकतो. शेतकरी प्रश्न विचारु लागले आहेत त्यांना उत्तर द्यायच सोडुन आमच्यावर टिका करण्याने काय साध्य होणार आहे.

हेही वाचा >>>अर्धवटरावांच्या टिकेल महत्व देत नाही; आमदार राणाजगजितसिंह पाटील यांची खासदार राजेनिंबाळकरांवर टीका

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

विमा प्रकरणी वारंवार पुरावे दिलेत व तुम्हाला खूपच कळत असेल तर त्यावर थेट बोलायचे सोडुन अस मोघम बोलुन आपल्या सडक्या बुध्दीच प्रदर्शन कशाला दाखवताय? तुमच्या धमकीला घाबरणारा शिवसैनिक नाही हे लक्षात ठेवा. दिल्लीत कशाला गेला होता हे सुध्दा आम्हाला ठाऊक आहे ते पण योग्यवेळी नक्कीच सांगु अन् निवडणुक लढायला तर तुम्ही कायमच तत्पर असतात. दुसर्‍या कोणाला उमेदवारी मिळु नये यासाठी तुमची धडपड सर्वांच्याच लक्षात येत आहे. पक्ष बदलला म्हणजे आत्मकेंद्री स्वभाव बदलत नसतो. ​माझी उमेदवारी जाहीर झाली नाही कारण तुमच्या पसंतीमुळेच ती मला मिळणार आहे​, अशा तोर्‍यात बोलुन आपली पावशेर अक्कल दाखवल्याचे सांगुन खासदार ओमराजे यांनी सणसणीत उत्तर दिले आहे.