Pankaja Munde : माझ्यापेक्षा कुणी उंच झालं तरच तुमचं नेतृत्व करु शकेल. माझ्यापेक्षा मनाने उंच, शरीराने उंच, विचारांनी उंच, आचारांनी उंच असं नेतृत्व लाभो अशा शुभेच्छा पंकजा मुंडेंनी उपस्थितांना दिल्या. तसंच त्यांनी धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याच्या प्रश्नावर भाष्य केलं.

कार्यकर्त्यांचं प्रेम मला प्रचंड लाभलं आहे

मला कार्यकर्त्यांचं प्रचंड प्रेम लाभलं आहे. मला कायमच हे वाटतं की तुमच्या सगळ्यांच्या अपेक्षा कशा पूर्ण करणार? मला टेन्शन येतं. असं पंकजा मुंडे म्हणाल्या तेव्हा गोपीनाथ मुंडे अमर रहेच्या घोषणा उपस्थितांनी दिल्या. त्यावर पंकजा मुंडे म्हणाल्या, मला तुमच्या सगळ्यांच्या डोळ्यांमध्ये गोपीनाथ मुंडे दिसतात. माझं कौतुक गोपीनाथ मुंडे करायचे, तुम्हीही करता. बाकी कुणी केलं नाही. मुंडे साहेब विचारायचे, पंकजा आली का? कशी चालली, कशी बोलली? माझ्यासारखी बोलते का? एक दिवस मला म्हणाले माझं काही काम नाही, ही माझी शेवटची निवडणूक. मी त्यांना विचारलं असं का म्हणता? तर म्हणाले समाज ज्या हातांमध्ये द्यायचा आहे ते हात तयार झाले. मी पुढची निवडणूक लढणार नाही असं गोपीनाथ मुंडे म्हणाले होते.

राजकारण म्हणजे गढूळ पाण्यात कपडे धुण्यासारखं-पंकजा मुंडे

राजकारण म्हणजे गढूळ पाण्यात कपडे धुण्यासारखे आहे. आपण किती दिवस त्यात तुरटी फिरवायची, काही लोक ठरवून सुपारी घेऊन आरोप करतात. कशातही आपलं नाव ओढतात, असं म्हणत पर्यावरण मंत्री तथा जालना जिल्ह्याच्या पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी राजकारणातील टीका-टिप्पणीवर खंत व्यक्त केलीय. जालना येथे शिवसेनेच्यावतीने पर्यावरण मंत्री तथा पालकमंत्री पंकजा मुंडे यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी त्या बोलत होत्या. तुमच्या नजरेत मला गोपीनाथ मुंडे दिसतात, ती नजर खाली जाऊ नये म्हणून राजकारणात आले आहे असंही पंकजा मुंडे म्हणाल्या.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यावर पंकजा मुंडे काय म्हणाल्या?

आता मुख्यमंत्र्यांनी उपमुख्यमंत्र्यांनी स्वतः विषय अजून तसा धनंजय मुंडेंकडे केला नाही. स्वतः अजित पवारांनी स्पष्ट सांगितलेलं आहे , यात संबंध आढळला तर आम्ही योग्य ती कारवाई करू. संबंध नसेल तर अन्याय व्हायला नको, हा अजित दादांचा निर्णय आहे, असं पंकजा मुंडेंनी सांगितले. तसेच तपास यंत्रणा त्यांना काळजी घेतील त्यावरच हे सगळं अवलंबून आहे. आपल्याला त्याच्याबद्दल माहिती नाही, असं पंकजा मुंडे यांनी म्हटलं आहे. तुमची जी काही सेवा करायची आहे ती मी करणार. तुम्हाला आपल्या पोरांना, नातवांना सांगावंसं वाटतं की ही पंकजाताई, हे माझं समाधान आहे असंही पंकजा मुंडे म्हणाल्या.