भाजपा नेत्या पंकजा मुंडे चेअरमन असलेल्या परळीतील वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याकडं १९ कोटी रूपयांची जीएसटी रक्कम थकली आहे. यामुळे कराची वसुली आणि मालमत्ता जप्ती संदर्भात छत्रपती संभाजीनगर येथील जीएसटी आयुक्तांनी कारखान्यास नोटीस जारी केल्याचं बोललं जात आहे. यावर आता पंकजा मुंडे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

प्रसारमाध्यमांशी बोलताना पंकजा मुंडे म्हणाल्या, “जे आकडे सांगितले जातात, ते व्याजाबाबत आहेत. कुठेही काहीही चुकीचं झालं नाही. कारखाना तोट्यात असतानाही शेतकऱ्यांचे पैसे देण्यात आले आहेत. ऊस आणि आर्थिक परिस्थितीमुळे कारखाना चालला नाही.”

“…तर हे प्रकार घडले नसते”

“८ ते ९ कारखान्यांनी दिल्लीत मदत मागितलेली, त्यात माझेही नाव होतं. पण, मी सोडून बाकींना आर्थिक मदत झाली. मदत मिळाली असती, तर हे प्रकार घडले नसते,” अशी खंत पंकजा मुंडे यांनी व्यक्त केली.

हेही वाचा : “राज ठाकरेंचं कौतुक करते, कारण…”, सुप्रिया सुळे यांचं विधान

“ज्योतिषाला विचारून सांगते”

राज्यातील भाजपा नेते तुमची कोंडी करत आहेत? कितीदिवस ही कोंडी सहन करणार? या प्रश्नांवरती पंकजा मुंडे म्हणाल्या, “मी सहनशील कन्या आहे. कितीदिवस सहन करायचं, हे ज्योतिषाला विचारून सांगते.”

हेही वाचा : “सरकार बदलतात, किंमत मोजावी लागणार”, संजय राऊतांचा राहुल नार्वेकरांना इशारा

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“…म्हणून कारवाई सुरू झाली असेल”

पंकजा मुंडेंच्या कारखान्याला मिळालेल्या नोटीसीबाबत अपक्ष आमदार बच्चू कडू यांनीही भाष्य केलं आहे. “पंकजा मुंडे यांनी यात्रा काढली आणि त्या स्वतः महाराष्ट्रामध्ये फिरल्या, त्यामुळेच त्यांच्यावर कारवाई सुरू झाली असेल, असं मला वाटतं” असं वक्तव्य बच्चू कडू यांनी केलं.