Check Prices Of Petrol And Diesel: आज ६ ऑगस्ट २०२४. आज पुन्हा एकदा पेट्रोल व डिझेलचे नवीन दर जाहीर झाले आहेत. महाराष्ट्रातील अनेक शहरांत पेट्रोल व डिझेलच्या किंमतीत सतत चढउतार पाहायला मिळतो. सध्या शहरांमध्ये दुचाकी, चारचाकी ऑफिसला घेऊन जाण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे कर्मचारी वर्ग घरातून बाहेर पडल्यावर अनेकदा पेट्रोल आणि डिझेलचे दर तपासून पाहतो. तर आज सकाळी इंधनाचे नवीन दर जाहीर झाले असून तुमच्या शहरांत पेट्रोल व डिझेलचा भाव काय आहे हे तुम्ही खाली दिलेल्या तक्त्यात तपासून पाहू शकता. महाराष्ट्रातील इतर शहरांत काय आहेत पेट्रोल आणि डिझेलचे नवे दर : शहरपेट्रोल (प्रति लिटर )डिझेल (प्रति लिटर )अहमदनगर१०४.५३९१.०६अकोला१०४.०५९०.६२अमरावती१०४.७८९१.३१औरंगाबाद१०४.९३९१.४३भंडारा१०४.७४९१.२७बीड१०५.६८९२.१७बुलढाणा१०६.१०९२.५६चंद्रपूर१०४.०४९०.६१धुळे१०३.९०९०.४५गडचिरोली१०५.१८९१.७१गोंदिया१०५.७७९२.२६हिंगोली१०५.८५९२.३४जळगाव१०५.२४९१.७६जालना१०५.९४९२.४०कोल्हापूर१०४.८२९१.३६लातूर१०५.४१९१.९१मुंबई शहर१०३.४४८९.९७नागपूर१०४.२६९०.८१नांदेड१०६.२८९२.७६नंदुरबार१०५.१४९१.६४नाशिक१०४.६९९१.२०उस्मानाबाद१०५.३३९१.८३पालघर१०३.८६९०.३७परभणी१०६.९३९३.३५पुणे१०४.०८९०.६१रायगड१०४.०६९०.५६रत्नागिरी१०५.३९९१.९०सांगली१०४.७७९१.३१सातारा१०५.१०९१.५९सिंधुदुर्ग१०५.९०९२.३९सोलापूर१०४.४९९१.०३ठाणे१०३.६९९०.२०वर्धा१०४.८५९१.३८वाशिम१०४.८७९१.४०यवतमाळ१०४.४१९०.९७ पेट्रोल-डिझेलचे आजचे दर : तक्त्यात नमूद केल्याप्रमाणे बुलढाणा, गडचिरोली, हिंगोली, जळगाव, नांदेड, उस्मानाबाद, रायगड, सांगली, सातारा शहरांत पेट्रोलचे दर वाढले आहेत. तर अमरावती, धुळे, कोल्हापूर, परभणी आदी शहरांत पेट्रोलच्या किंमतीत किंचित घसरण पाहायला मिळाली आहे. तर औरंगाबाद, हिंगोली, गोंदिया, जळगाव, वर्धा या महाराष्ट्रातील शहरांमध्ये डिझेलच्या किंमतीत दरवाढ झालेली दिसून आली आहे. तर लातूर , रत्नागिरी, सांगली, यवतमाळ शहरांमध्ये डिझेलच्या किंमतीत किंचित घसरण पाहायला मिळाली आहे. दररोज सकाळी सहा वाजता पेट्रोल आणि डिझेलच्या किमती बदलतात. नवीन दर सकाळी सहा वाजल्यापासून लागू होत असतात. पेट्रोल डिझेलच्या किमतीत उत्पादन शुल्क, डीलर कमिशन आणि इतर गोष्टी जोडल्यानंतर त्याची किंमत जवळजवळ दुप्पट होते. परदेशी विनिमय दरासह आंतरराष्ट्रीय बाजारात क्रूडचे दर काय आहेत, यावर पेट्रोल वडिझेलचे दर दररोज बदलत असतात आणि ते नंतर सामान्य नागरिकांपर्यंत पोहचवले जातात. घराबाहेर पडण्यापूर्वी तुम्ही मोबाईलद्वारे सुद्धा दर तपासू शकता. एसएमएसद्वारे जाणून घ्या दर : देशभरात पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती जाहीर करण्यात आल्या आहेत. कच्च्या तेलाच्या आंतरराष्ट्रीय किमतींनुसार भारतात इंधनाची किंमत ठरवली जाते. तुम्ही तुमच्या शहरातील पेट्रोल आणि डिझेलचे रोजचे दर एसएमएसद्वारे देखील जणून घेऊ शकता. इंडियन ऑइल (IOC) ग्राहक RSP<डीलर कोड> ९२२४९९२२४९ या क्रमांकावर पाठवू शकतात आणि HPCL (HPCL) ग्राहक ९२२२२०११२२ या क्रमांकावर HPPRICE <डीलर कोड> पाठवू शकतात. BPCL ग्राहक ९२२३११२२२२ या क्रमांकावर RSP<डीलर कोड> पाठवू शकतो