PM Narendra Modi On Congress : महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणुकीची धामधूम सुरु आहे. आता येत्या २० नोव्हेंबर रोजी विधानसभेसाठी मतदान होणार आहे, तर २३ नोव्हेंबर रोजी निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे. या निवडणुकीकडे अवघ्या देशाचं लक्ष लागलेलं आहे. सध्या सर्वच राजकीय पक्षांच्या नेत्यांकडून राज्यात जोरदार प्रचार सुरु आहे. प्रचारासाठी दिल्लीतील दिग्गज नेत्यांनी देखील महाराष्ट्रात तळ ठोकला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शाह यांच्याही सभा विविध मतदारसंघात पार पडत आहेत. आज पंतप्रधान मोदी यांची नवी मुंबईत सभा पार पडली. या सभेत बोलताना मोदींनी काँग्रेस आणि महाविकास आघाडीवर जोरदार हल्लाबोल केला. ‘काँग्रेसने गरिबी हटावचा खोटा नारा दिला गरिबांना लुटण्याचं काम केलं’, असा हल्लाबोल मोदींनी केला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी काय म्हणाले?

“महाराष्ट्रातील सरकार महिलांना डबल लाभ देत आहे. लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून सरकार मदत करत आहे. मात्र, हे महाविकास आघाडीवाले या योजनेच्या विरोधात न्यायालयात गेले होते. त्यामुळे त्यांचा उद्देश काय आहे? हे तुम्ही ओळखा. महाविकास आघाडीला यावेळी संधी देऊ नका. काँग्रेसची महाराष्ट्रात सत्ता नाही. अनेक राज्यात महाराष्ट्रात सत्ता नाही. त्यामुळे ते सत्ता मिळवण्यासाठी कोणत्याही थराला जाऊ शकतात. काँग्रेसवाले द्वेशाचं विष पेरण्याचं काम करत आहेत. काँग्रेसची मानसिकता ही दलित आदिवासी कमजोर व्हावे, ओबीसी कमजोर व्हावेत, अशी मानसिकता त्यांची आहे. या समाजाला वेगळं करून सत्तेत येण्याची धडपड आणि जातीच्या आधारावर वाद लावण्याचा काँग्रेसचं षडयंत्र आहे. त्यामुळे ‘हम एक है तो सेफ है!”, असं म्हणत मोदींनी जोरदार हल्लाबोल केला.

हेही वाचा : “आम्ही बाळासाहेबांचं स्वप्न पूर्ण केलं”, पंतप्रधान मोदींचं छ. संभाजीनगरमध्ये वक्तव्य; काँग्रेसवर टीका करत म्हणाले…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“तुमचं सर्वांचं भवितव्य महायुतीच्या हातात सुरक्षित आहे. त्यामुळे महाराष्ट्रात महायुतीचं सरकार हंव. गेल्या १० वर्षांत आमच्या सरकारने २५ कोटी लोकांना गरीबीमधून बाहेर काढलं. ४ कोटी लोकांना पक्के घरे दिली. सर्वात जास्त लाभार्थी सर्वसामान्य लोक आहेत. अशा प्रकारचं काम याआधीही होऊ शकलं असतं. मात्र, काँग्रेसची ही मानसिकता नाही. आजही काँग्रेस गरिबांसाठी सरु केलेल्या योजनेला विरोध करण्यात काम करतं. आम्ही देशातील ८० कोटी लोकांना मोफत राशन देत आहोत. मात्र, काँग्रेस यालाही विरोध करतं. काँग्रेसने गरिबी हटावचा खोटा नारा दिला”, असा हल्लाबोल मोदींनी विरोधकांवर केला.