कराड : कराड शहरात प्रतिबंधित पान मसाल्यासह तंबाखुजन्य पदार्थांची विक्री करणाऱ्या विक्रेते, तसेच व्यापाऱ्यांवर पोलिसांनी धडक कारवाई केली. पोलीस उपअधीक्षक कार्यालयाचे विशेष पथक आणि कराड शहर पोलीस ठाण्याच्या पथकांकडून ही मोहीम राबवण्यात आली. त्यात हजारो रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.

याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, की शहरातील काही विक्रेते, तसेच व्यापाऱ्यांकडे प्रतिबंधित पानमसाला आणि तंबाखुजन्य पदार्थ असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार पोलीस उपअधीक्षक कार्यालयाचे विशेष पथक व कराड शहर पोलीस ठाण्यातील एक पथक तैनात करण्यात आले. या पथकांनी शहरातील कोल्हापूर नाका, पोपटभाई पेट्रोल पंप चौक, भेदा चौक, बसस्थानक परिसर, विजय दिवस चौक, कृष्णा नाका, कार्वेनाका यासह शहरातील काही दुकानांवर छापे टाकले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पोलिसांनी तपासणी केली असता अनेक दुकानांत प्रतिबंधित पानमसाला व तंबाखुजन्य पदार्थ आढळून आले.याप्रकरणी पोलीस उपअधीक्षक कार्यालयाच्या पथकाने नऊ जणांकडून मुद्देमाल हस्तगत करत त्यांच्यावर कराड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. तर, शहर पोलीस ठाण्याच्या पथकानेही आठ ते दहा दुकानांवर छापा टाकून मुद्देमाल जप्त करताना, संबंधित विक्रेत्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.