सांगली : यापुढे इस्लामपूर-वाळवा मतदारसंघावर देखील आपले दसपटीने लक्ष राहील आणि या मतदारसंघात आता नवीन निर्णय घ्यावे लागतील, अशा शब्दात सांगलीचे खासदार विशाल पाटील आणि काँग्रेसचे आमदार डॉ.विश्वजित कदम यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना अप्रत्यक्ष इशारा दिला.

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष

आ. पाटील यांच्या इस्लामपूर- वाळवा मतदार संघातल्या कसबे डिग्रज येथे आयोजित सत्कार समारंभात दोघे बोलत होते. खासदार पाटील यांचा आ. कदम यांच्या उपस्थितीत कसबे डिग्रज येथे सत्कार शनिवारी रात्री आयोजित करण्यात आला होता. विशेष म्हणजे सांगली लोकसभा मतदार संघात नसणारे कसबे डिग्रज हे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या मतदारसंघातील गाव आहे.

Sujay Vikhe, Nilesh Lanke selection,
नीलेश लंकेंच्या निवडीला सुजय विखेंकडून आव्हान
Amol Kirtikar challenge to Ravindra Waikar MP
वायकर यांच्या खासदारकीला अमोल कीर्तिकरांचे आव्हान
Murbad MLA Kisan Kathore Vs Kapil Patil
मुरबाडमध्ये कथोरेंची महायुतीतच कोंडी?
Bhagirath Bhalke meet Sharad Pawar
भगीरथ भालके शरद पवारांच्या भेटीला, घरवापसीच्या चर्चांना उधाण, पंढरपूरमध्ये राष्ट्रवादीची ताकद वाढणार?
Ajit Pawar vilas lande
अजित पवारांच्या चिंता वाढली? आमदार विलास लांडे शरद पवारांच्या संपर्कात? जवळचा मित्र म्हणाला, “त्या भेटीनंतर…”
leaders photo missing from rohit patil birthday hoarding
आमदारपुत्र रोहित पाटलांच्या वाढदिनी शुभेच्छा जाहिरात फलकावरुन वरिष्ठ नेत्यांची फोटो गायब
gold chain thief
सातारा: सोनसाखळी चोरट्याकडून २७ लाख ७८ हजारांचा मुद्देमाल हस्तगत
“…तर दगडालाही शेंदूर फासून लढण्याची तयार ठेवा,” खासदार अरविंद सावंत यांचे शिवसैनिकांना आवाहन; म्हणाले, “मातोश्रीचे आदेश…”

हेही वाचा…“४०० पार झालो असतो तर भारत हिंदू राष्ट्र घोषित झालं असतं”, भाजपा आमदाराचं विधान चर्चेत; भिवंडीतील धर्मसभेत केलं भाष्य!

यावेळी बोलताना खासदार पाटील यांनी विश्वजीत कदम आघाडीत असल्यामुळे काही बोलू शकत नाहीत. मात्र मी अपक्ष खासदार असल्याने काहीही करू शकतो, आपण दिल्लीत काँग्रेसला पाठिंबा दिला आहे. पण अपक्ष खासदार म्हणून या इस्लामपूर मतदारसंघावर विशेष लक्ष राहणार आहे.या मतदार संघातील सगळ्यांची मोट बांधण्याची जबाबदारी माझी असून सांगली लोकसभा मतदारसंघातल्या गावांचा सत्कार व्हायचा असताना,तुमच्या गावात येऊन सत्कार स्वीकारतोय,यावरुन तुम्ही ओळखले पाहिजे आहे,पुढची दिशा काय असणार आहे आणि काय राहिले पाहिजे.

हेही वाचा…एकनाथ खडसे आणि गिरीश महाजन यांच्यातील वाद संपणार? रक्षा खडसे म्हणाल्या, “दोन्ही नेत्यांना…”

डॉ. कदम म्हणाले, आम्ही सर्व खंबीरपणे कसबे डिग्रज मधल्या जनतेच्या पाठीशी आहोत. कसबे डिग्रजवर जेवढे लक्ष आमचं नव्हते, त्याच्या दहा पटीने येणाऱ्या काळात लक्ष देऊ, सांगली लोकसभा निवडणुकीतील विजयानंतर थेट जयंत पाटलांच्या मतदारसंघात जाऊन विशाल पाटील आणि विश्वजीत कदम यांनी सत्कार स्वीकारत केलेली वक्तव्ये सांगली जिल्ह्यातील राजकारणात नव्या संघर्षाचे ठिणगी असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.