लोकसभा निवडणुकीनिमित्त आयोजित काँग्रेस उमेदवाराची प्रचारसभा आटोपून परत येत असताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या कारचा भंडाऱ्यात भीषण अपघात झाला. भंडारा शहरालगतच्या भिलेवाडा गावाजवळ मंगळवारी मध्यरात्री ही दुर्घटना घडली असून यात कारचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. नाना पटोले किंवा त्यांच्याबरोबर कारमध्ये असलेल्या इतर कोणालाही गंभीर दुखापत झालेली नाही. पटोले मंगळवारी आपली सुनिश्चित प्रचारसभा आटपून सुकळी या गावी जात असताना मध्यरात्रीच्या सुमारास मागून येणाऱ्या ट्रकने त्यांच्या उभ्या कारला जोरदार धडक दिली. या धडकेत गाडीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. सुदैवाने नाना पटोले या अपघातात थोडक्यात बचावले.

दरम्यान, या अपघातानंतर विरोधी पक्षांमधील काही नेत्यांनी घातपाताचा संशय व्यक्त केला आहे. विरोधी पक्षाच्या नेत्यांना संपवून भाजपाला निवडणूक जिंकायची आहे का? असा प्रश्न काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे यांनी उपस्थित केला आहे. तसेच, नाना पटोलेंच्या गाडीला झालेला अपघात ही अत्यंत गंभीर घटना असून त्यांचा घातपात करण्याचा डाव होता का? अशी शंकाही अतुल लोंढेंनी उपस्थित केली आहे.

raj thackray mns latest news
“राज ठाकरेंच्या भूमिकेमुळे कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम”, मनसेला गळती; सात शिलेदारांचा पक्षाला ‘जय महाराष्ट्र’
eknath khadse
”…म्हणून मी भाजपात प्रवेश करणार आहे”, एकनाथ खडसेंचं वक्तव्य चर्चेत
raj thackeray amit shah (
भाजपाने मनसेला नेमकी काय ऑफर दिलेली? राज ठाकरे म्हणाले, “त्यांनी मला सांगितलं…”
Shiv Sena Thackeray Group Leader Chandrakant Khaire Announces His Political Retirement
मोठी बातमी! चंद्रकांत खैरेंनी केली राजकीय निवृत्तीची घोषणा, म्हणाले, “अंबादास दानवे..”

अतुल लोंढेंपाठोपाठ वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनीदेखील अशीच शंका उपस्थित केली आहे. प्रकाश आंबेडकर यांनी काही वेळापूर्वी अकोल्यात प्रसारमाध्यमांशी बातचीत केली. यावेळी ते म्हणाले, निवडणुकीच्या काळात अशा प्रकारे एखाद्या नेत्याचा अपघात होतो तेव्हा असे विषय सरकारने गांभीर्याने घ्यायला हवेत. निवडणूक म्हटली की थोडीफार खुन्नस असतेच. ही गोष्ट नाकारता येणार नाही. पोलिसांनी तपास केला पाहिजे. त्या चालकाची चौकशी करायला हवी. मी राज्य सरकारकडे मागणी करेन की, वेगवेगळ्या पक्षांचे जे महत्त्वाचे नेते आहेत त्यांना निवडणुकीच्या काळात अतिरिक्त सुरक्षा पुरवली पाहिजे. या अपघातात नाना पटोलेंना दुखापत झालेली नाही ही चांगली गोष्ट आहे. ते व्यवस्थित आहेत याचं समाधान आहे. त्यांचं आरोग्य असंच राहो अशी मी निसर्गाकडे पार्थना करतो.

हे ही वाचा >> ”…म्हणून मी भाजपात प्रवेश करणार आहे”, एकनाथ खडसेंचं वक्तव्य चर्चेत

दरम्यान, ट्रकचालकाचे ट्रकवरील नित्रंयण सुटल्याने हा अपघात झाला असावा, असा प्राथमिक अंदाज वर्तवला जात आहे. पोलीस याप्रकरणी तपास करत आहेत.