लोकसत्ता प्रतिनिधी

सातारा : साताऱ्यातील ऐतिहासिक प्रतापगड (ता. महाबळेश्वर) हा किल्ला राज्य संरक्षित स्मारक म्हणून राज्य शासनाने घोषित केले आहे. लवकरच युनेस्कोद्वारा जागतिक वारसा स्थळ २०२४ यादीत प्रतापगडचे नामांकन करण्यासाठी त्यांचे पथक गडावर येणार आहे. त्या अनुषंगाने प्राचीन व ऐतिहासिक स्मारक संरक्षित स्मारक म्हणून घोषित केल्याने शासनाच्या अधिसूचनेला महत्त्व प्राप्त झाले आहे.

प्राचीन व ऐतिहासिक स्मारक संरक्षित स्मारक म्हणून घोषित करण्याचा शासनाचा इरादा असल्याने याबाबत कोणाची काही हरकत असल्यास ती घेण्यासाठी दोन महिन्यांची मुदत दिली होती. किल्ले प्रतापगड संरक्षित स्मारक म्हणून घोषित करण्यासंबंधी शासनाकडे कोणत्याही हरकती आलेल्या नाहीत. त्यामुळे प्राचीन व ऐतिहासिक स्मारक हे संरक्षित स्मारक असल्याचे शासनाने अधिसूचना काढत जाहीर केले आहे.

आणखी वाचा-आमदार राजेंद्र राऊत यांचे ठिय्या आंदोलन स्थगित

युनेस्कोद्वारा जागतिक वारसा स्थळ २०२४ यादीत नामांकनाच्या पूर्वतयारीच्या अनुषंगाने किल्ले प्रतापगडची ‘स्वच्छता ही सेवा’ उपक्रमातून सातारा जिल्हा परिषदेच्या वतीने महास्वच्छता अभियान राबविण्यात आले आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

राज्यातील गड-किल्ल्यांचा समावेश युनेस्कोच्या नामांकनामध्ये होण्यासाठी प्रयत्न करत आहे. त्यासाठी साताऱ्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी युनेस्को पथकाची किल्ले प्रतापगड भेट, त्याच्या नामांकनासाठीच्या पूर्वतयारीची जबाबदारी सातारा जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी याशिनी नागराजन, वाईचे प्रांताधिकारी राजेंद्र कचरे, महाबळेश्वरच्या तहसीलदार तेजस्विनी पाटील यांच्यावर सोपविली आहे. सातारा व महाबळेश्वर तालुक्यातील शासनाचे सर्व विभाग यासाठी सक्रिय झाले आहेत.