Prithviraj Chavan claims Modi Government will collapse Soon : “आगामी विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रात सत्तांतर झालं तर केंद्रातील नरेंद्र मोदींचं सरकार देखील पडेल”, असा दावा महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री व काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी केला आहे. केंद्रातील मोदींचं सरकार हे नितीश कुमार यांचा संयुक्त जनता दल आणि चंद्राबाबू नायडू यांच्या तेलुगू देशम पर्टीच्या पाठिंब्यावर उभं आहे. मात्र, “नितीश कुमार व चंद्राबाबू नायडू भाजपाला सोडून जातील” असा दावा पृथ्वीराज चव्हाण यांनी केला आहे. ते म्हणाले, अटल बिहारी वाजपेयी यांचं सरकार १३ महिन्यांत कोसळलं होतं. त्याचप्रमाणे मोदींचं सरकारही कोसळेल.

पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, तुम्ही (महाराष्ट्रातील जनता) महाराष्ट्रात सत्तांतर घडवून आणलंत तर दिल्लीतलं मोदींचं सरकार फार दिवस टिकणार नाही. हरियाणा राज्यात सत्तांतर होत आहे. त्यामुळे आता केंद्रातील मोदींची खुर्ची डळमळीत झाली आहे. विधानसभेच्या निवडणुका झाल्यानंतर महाराष्ट्र व हरियाणातील सत्तांतर पाहून चंद्राबाबू नायडू व नितीश कुमार हे मोदींना सोडून जातील. अटल बिहारी वाजपेयी यांचं सरकार १३ महिन्यांमध्ये कोसळलं होतं. भारतात लवकरच त्याची पुनरावृत्ती होताना तुम्हाला दिसेल.

हे ही वाचा >> Sitaram Yechury : राज ठाकरेंची सीताराम येचुरींसाठी पोस्ट; म्हणाले, “विचारसरणीवर श्रद्धा ठेवणारे फक्त कम्युनिस्टच उरलेत”

महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करण्याच्या हालचाली, पृथ्वीराज चव्हाण

महाराष्ट्रातील विधानसभा निवडणूक अद्याप जाहीर झालेली नाही. मात्र पृथ्वीराज चव्हाण यांनी राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याच्या हालचालींना वेग आल्याचा दावा गेल्या आठवड्यात केला होता. “महाराष्ट्रातील सध्याची परिस्थिती निराशाजनक आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळणे, बदलापुरात झालेली घटना यामुळे सरकारच्या कार्य पद्धतीवरच अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. या नकारात्मक वातावरणातून सुटका करून घेण्यासाठी राज्यात राष्ट्रपती राजवट लागू केली जाणार आहे”.

हे ही वाचा >> Eknath Khadse : “फडणवीसांनी मुलीची शपथ घेऊन मला आश्वासन दिलेलं की…”, एकनाथ खडसेंचा मोठा गौप्यस्फोट

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

माजी मुख्यमंत्री म्हणाले, “सिंधुदुर्ग जिल्ह्यातील राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याचं प्रकरण, बदलापूरमधील चिमुकल्या मुलींवरील बलात्काराची घटना व राज्यातील कायदा सुव्यवस्थेच्या प्रश्नामुळे जनतेच्या मनात सरकारविषयी प्रचंड रोष आहे. पुतळ्यावरून तर राज्यभर संतप्त भावना उमटत आहेत. गेल्या शंभर वर्षांत देशात कधी पुतळा पडला नाही. त्यामुळे जगभरातही उलट-सुलट चर्चा सुरु आहेत. भाजपाला निवडणुकीत याचे परिणाम भोगावे लागतील.